१२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
किंवा इतर लोक काय ज्यांच्या ज्यांच्या अन्यायमूलक परंपरागत हितसंबंधांना अशा सुधारणांमुळे धक्का बसण्याचा संभव असतो ते विरोध करावयाचेच. इंग्लंडात व इतर पाश्चात्य देशात बहुजनसमाजाच्या हक्कासंबंधाचे कायदे, अनेक अपयशस्वी प्रयत्न झाल्यावरच, पसार झाले; we हिंदुस्थानातही सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा होण्यास किती तरी वर्षे लोटावी लागली; ही उदाहरणे विसरून चालावयाचें नाही. आजच आपल्यास पाहिजे ती सुधारणा वतन अँक्टात झाली नाहीं म्हणून हताश होऊन हातपाय गाळून बसण्याचें कारण नाही. आपला निर्धार कायम असला तर कितीही दांडगा विरोध झाला तरी त्याला न जुमानतां आज ना उद्या तरी आपल्यास पाहिजे ती सुधारणा आपण घडवून आणूं शकं. या बाबतीत चळवळ सतत चालू ठेवणें हें
महार वतन परिषदेचें कर्तव्य
आहे. या परिषदेच्या कल्पनेला मूर्त स्वरुप देणें चालकांना अद्यापि शक्य झालें नाही. परिषद यापूर्वीच भरली असती तर बरे झाले असतें. परंतु बिल तूर्त मागे घेण्यात आलें असलें तरी परिषदेची आवश्यकता नाही असें नाही. जोपर्यंत महार वतनासंबंधाची सदरील बिलात दर्शविलेली सुधारणा वतनासंबंधाच्या कायद्यामध्ये झाली नाही तोंपर्यंत चळवळीची जरूरी आहें हे स्पष्ट आहे. महार वतनपरिषद ही संस्था तोंपर्यंत कायम ठेवून तिच्या विद्यमाने वार्षिक परिषदा भरविणे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा भरविणे, सरकारकडे डेप्युटेशन पाठविणे, सद्याच्या कायद्यामुळे महार समाजाचें कसे नुकसान होत आहे हे दाखविण्याची इंग्रजी व देशी भाषांतल्या वर्तमानपत्रांमध्ये वेळोवेळी लेख प्रसिद्ध करणें, इतर लोकांचे मत शक्य तितकें अनुकूल करून घेण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करणें, ही कामे चालू राहिली पाहिजेत. खास त्याच कामाकरिता एक स्वतंत्र संस्था असल्याशिवाय ती नियमितपणे व सतत होत राहणे शक्य नाही. बिलामुळे उत्पन्न झालेल्या उत्साहाच्या योगानें परिषदेसाठी थोडाबहुत फंड गोळा झालेला आहे. या पैशाचा विनियोग लोकांकडून ज्या कामाकरिता तो मागून घेण्यात आला
त्याच कामाप्रीत्यर्थ झाला पाहिजे.
त्या पैशाचा विनियोग दुसऱ्या कामी करण्याची खटपट वतन परिषदेच्या कार्यकारी मंडळातील कित्येकांनी चालविली असल्याबद्दलची गुणगुण आमच्या कानीं आली आहे. म्हणून या बाबतींत स्पष्ट इषारा देणें आम्हांस जरूरीचें वाटतें. एक तर, एका कामासाठी मिळविलेल्या पैशाचा उपयोग ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांच्या संमतीखेरीज दुसऱ्याच कामाकडे करण्याचा अधिकार कोणालाही नाही हे विसरता कामा नये. ज्या दुसऱ्या कामाकडे विनियोग करावयाचा तें उपयुक्त व