वतन बिलाची तात्पुरती इतिश्री ! १३१
आहे. खोतांमध्यें ब्राह्मण, मराठा वगैरे स्पृश्य हिंदु यांचा भरणा असून थोडे मुसलमान खोतहि आहेत. हे -सर्व जातींचे खोत कुळांना म्हणजे कुणबी व अस्पृश्य वर्गातले लोक यांना नाना प्रकारांनी नाडतात, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करितात, परंतु कुळांच्या हक्काचा प्रश्न निघाला म्हणजे ब्राह्मण व ब्राह्मणेतर खोत एक होऊन कुळांची गुलामगिरी कायम ठेवण्यासाठी आकाशपाताळ एक करितात. कुळांनी आपली चळवळ आरंभिली तेव्हां तिला विरोध करण्याकरितां मुंबई शहरामध्ये ब्राह्मणेतर मंडळीनेंच सभांचा धूमधडाका लावला होता. खोतांची बाजू घेणाऱ्या मंडळींत ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी म्हणविणारेहि कांही लोक सामील झाले होते आणि कुळांची बाजू घेणारे रा. ब. बोले, अँड. सुर्वे वगैरे ब्राह्मणेतर पुढाऱ्यांवर मराठी मंडळी उलटून पडली होती. ब्राह्मणेतर पक्षाची विशेषतः मराठा जातीची सहानुभूति मिळविण्यार्कारेतां कुणबी लोकांनीं शिकस्तीचे प्रयत्न केले, परंतु त्यांत त्यांना यश आले नाहीं. थोड्या वर्षापूर्वी ब्राह्मणेतर पक्षाच्या मुकुटमणी पुढाऱ्याच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहरांत कुणब्यांनीं अर्थात खोती कुळांनीं एक सभा भरविली होती. त्या सभेंत जे ठराव पास झाले होते त्यांमध्ये खोती पद्धती नाहीशी करावी अशी सरकारला विनंति करण्याचा ठराव सभेपुढे
आला तेव्हां अध्यक्षांनी त्याला कांहीं हरकत घेतली नाही आणि तो सर्वानुमतें पसार
झाला. परंतु सदर सभेंत पसार झालेले ठराव अध्यक्षांच्या GEM सरकारकडे पाठविण्याची वेळ आली तेव्हां सदरील ठराव पाठवावयाचा असेल तर आपण सही करणांर नाहीं असें अध्यक्षांनी चक्क सांगितलें ! अंतस्थ कारण काय तर
अध्यक्षांच्या सोयऱ्या पाहुण्यामंडळींत कांहीं मराठे खोत होते ! अस्पृश्य
समजल्या जाणाऱ्या वर्गाच्या उन्नतींच्या आड ब्राह्मणच येतात असें
नाहीं. ब्राह्मणेतरहि आड येतात. अस्पृश्यांना मारहाण करण्यांत व त्याचा
छळ करण्यांत ब्राह्मणेतर पुढाकार घेतात, परंतु ब्राह्मणेतर पुढारी सगळें खापर
ब्राह्मणांच्याच डोक्यावर फोडून मोकळे होऊ पाहतात. महार वतन बिलाचा
सिलेक्ट कमिटीत विचका करणारे एक ब्राह्मणेतर पुढारी रा. नवले, एम. एल.
सी... यांचेहि उदाहरण या बाबतींत लक्षात ठेवण्यासारखें आहे. सारांश, दुबळा '
जातीच्या लोकांशीं पाटीदार कुणब्यांचे वर्तन आहे त्याबद्धल वल्लभभाईंना दोष
देऊन त्यांची नालायकी सिद्ध करावयाची तर da माप महाराष्ट्रांतील
ब्राह्मणेतरपक्षाच्या पुढाऱ्यांनाहि लागू करून त्यांची नालायकी सहज शाबीद
करतां येईल.
७७७
ieee ere
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९.