कम्युनिझम पाहिजे तर करबंदी कां नको ? . . - Page 174

vee, PO |

कम्युनिझम पाहिजे तंर करबंदी कां नको ?

लॅडलीगच्या चळवळीत ब्राह्मणेतरांनीं कां पडूं नये तर त्या 'चळवळीचा अंतःस्थ हेतु सरकारविरुद्ध करबंदीची चळवळ करण्याचा आहे असें ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनीं जाहीर केलं आहे. खरें पाहिलें असतां महाराष्ट्रांतले केळकर, भोपटकरासारखे पुढारी करबंदीची चळवळ करण्याचे धाडस करतील असें आजपर्यंतच्या त्यांच्या इतिहासावरून मानण्यास कांहीं जागा. नाहीं. परंतु, तें कंसेंहि असलें तरी करबंदीच्या चळवळीचा ब्राह्मणेतरांनीं एवढा बाऊ तरी कां करावा ? शेतकऱ्यांचें हितं पाहावयाचे तर वेळ पडल्यास करंबंदीचीहि चळवळ करावयास नको काय ? बाकी सर्व उपाय हरले, शेतकऱ्यांची तक्रार सकारण असून त्यांची दाद सरकारनें घेतली नाहीं, तरी शांततापूर्वकं. करबंदीची चळवळ करूं नये असें ब्राह्मणेतर 'पुढान्यांचे म्हणणें 'आहे' काय ? “बार्डोलीच्या- लढ्याच्या. वेळीं ` करबंदीच्या उपायाचा आश्रय करण्यांत आला नसता तर बार्डोलीच्या शेतकऱ्यांची दाद लागली असती . काय ? - त्यावेळीं ब्राह्मणेतर . पत्रांनीहिं बार्डोलीच्या वल्लभभाई . प्रभृति पुढाऱ्यांचे अभिनंदन. केलें .नव्हतें काय ? मग आतांच करबंदीचा. बाऊ करण्यांत. अर्थ. कोणता ? ज्या ब्राह्मणेतर पत्रकारांनी लँड लीगच्या. विरुद्ध सध्यां आपली, लेखणी .चालविली आहे त्यांनीच आतांपर्यंत मुंबईतल्या कम्युनिस्ट चळवळींचे कौतुक केलें आहे, कम्युनिझंमचा उद्देश मुळाशी असल्याचा. आरोप करून कोणी कामगारांच्या चळवळीला नावे ठेंवूं नयेत आणि कम्युनिस्टांच्या यूनियनंनें पुकारलेला संप कामगारांच्या नाशाला कारण होणारा असला तरी त्याला सर्वांनी पाठबळ द्यावें असें प्रतिपादिले आहे. सदरील यूनियन स्थापणारे कम्युनिस्ट' ब्राह्मण होते, परंतु त्या मुद्यावर या पुण्या-बेळगांवच्या ब्राह्मणेतर पत्रकारांनी आतांपर्यंत जोर दिला नाहीं. कारण उघडच आहे. त्या गोष्टी परभारें होत होत्या |: शेतकरी संघांची बाब ब्राह्मणेतर पुढाच्याच्या अंगाशी लगटणारी पंडली आणि त्यांतून मोठ्या -पुढाच्यांचें फर्मान सुटलं. या मोठ्या पुढाऱ्यांना सरकारची मर्जी सांभाळावयाची होती. . ` म्हणून करबंदीसंबंधानें उगाच मोठा बाऊ:करून ब्राह्मणेतर. वर्गाला लँड लीगपासून अलिप्त ठेवण्याची धडपड करण्यांत आली, हैं. लोकांच्या लक्ष्यांत आल्यावांचून राहिलेलें नाहीं... हें त्या पुढाऱ्यांनी व त्यांच्या सांगण्याप्रमाणे टिमकी वाजविणाऱ्या पत्रकारांनी समजून असाव.

l

७७७

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट .१९२९.