कुलाबासमाचारा | चा चावटपणा - Page 175

५२

कुलाबासमाचारा “ चा चावटपणा ~

:. पेण येथें प्रसिद्ध होणाऱ्या 'कुलाबासमाचारा' ची वावदूकपणादिषयीं प्रसिद्धीच आहे. वावदूकपणाला खोडसाळपणाची: जोड देण्यांत आणि कुचकट' अनुदार विचारांचें निर्लज्जपणे प्रदर्शन करण्यांत या पत्रकाराचा हातखंडा आहे... गेल्या ता. १७ जून रोजीं कुलाबा जिल्हाःबोर्डाची सभा भरली असतां तिसन्या प्रहरी चहापानाकरितां झालेल्या सुट्टीमध्ये सदरील बोर्डाचे एक सरकारनियुक्त सभासद, अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधि; रा. भातणकर हे, स्पृश्य सभासद जेथें चहाःपीत बसले होते तेथें मुद्दाम शिरले व इतरांबरोबर त्यांनीं चहा घेतला, तें पुष्कळांना रुचलें नाहीं, असें लिहून यापुढें भातणकर यांनीं-वेगळ्या'ठिकाणीं चहा घ्यावा, अशी त्यांना ढोंगी मित्रत्त्वाने' समाचारा ' नें सूचना केली आहे. या.बाबतींत आम्हीं चौकशी केली तेव्हां ' कुलाबासमाचारा ' नें हें. सगळें कुभांड रचिलें आहे, असें आम्हांस आढळून आलें, खरा प्रकार असा आहे कीं, सदरील दिवशीं चहाची सुट्टी झाल्यावर बाकी सर्व सभासद चहा पिण्याच्या खोलींत गेले व भातणकर. हे आपल्याच :जागीं बसून राहिले. तेथें बोर्डाचा शिपाई आला. व “ लुम्हांस' प्रेसिडेंट -साहेब चहा पिण्याकरितां बोलावीत आहेत ' म्हणून त्यानें त्यांस सांगितलें. चहाच्या खोलींत गेल्यावर बोर्डाचे बाकी सर्व सभासद व बाहेरीलहि कांहीं मंडळी चहा घेत उभी असल्याचें दिसून आलें. भातणकरहि तेथें उभे राहिले व शिपायांनें चहाचा कप त्यांच्या हातीं दिला. तो चहा भातणकरांनीं इतरांबरोबर उभें राहून घेतला. त्यावेळीं बोर्डाचा कोणी सभासद त्या बाबतींत बोलला नाहीं, व चहा तसाच टाकून कोणी बाहेर गेलाहि नाहीं. त्या बाबतींत त्या दिवशीं त्या खोलींत

किंवा त्यानंतर बोर्डाच्या सभेंत कांहींच चर्चा झाली नाहीं. परंतु ' कुलाबासमाचार '

पत्राने खोडसाळ व आगलावेपणाची बातमी प्रसिद्ध केली तिचा मात्र बोर्डाच्या

सभासदांवर दुष्ट परिणाम झाला. कारण, ता. २७ जून रोजीं बोर्डाची सभा भरली

त्यावेळीं चहाच्या सुट्टीत अध्यक्षांनी अगोदरच भातणकरांना एका बाजूस बोलावून : _ नेलें आणि सांगितलें कीं, ' गेल्या खेपेप्रमाणेंच आपण स्पर्शास्पर्शमेद न पाळतां

या वेळींहि एकत्र चहा घेतला तर आजचा माझा चहाचा खर्च फुकट जाणार

आहे. तरी तुम्ही वेगळ्याठिकाणीं चहा घ्या. ' त्यावर अंध्यक्षांना भातणकरांनीं