कुलाबासमाचारा | चा चावटपणा - Page 176

१३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विचारलें कीं, आपण सर्वाकरितां चहा केला आहे ना ? त्यावर अध्यक्षांनीं ' होय ' असें उत्तर दिलें. . तेव्हां भातणकर म्हणाले कीं, ' तसें असेल तर वेगळ्या ठिकाणीं मी मुळींच चहा घेणार नाहीं '. ' तुम्ही व मी मिळून एका ठिकाणीं चहा घेऊ ' असें अध्यक्षांनी सुचविल्यावर भातणकरांनीं, ही खाजगी गोष्ट नाहीं त्याअर्थी वरील सूचना आपल्यास कबुल नाहीं असें सांगितलें. तेव्हां अध्यक्ष म्हणाले कीं, आपल्या मंनांत कांहींहि किंतु नाहीं, परंतु बोर्डाचे दुसरे कांहीं सभासद हरकत घेत असल्यामुळें आपला नाईलाज आहे. इतक्यांत रा. भाटे यांना अध्यक्षांनी बोलावलें व ही हकीकत सांगितलीं. तेव्हां भाटे म्हणाले कीं, “मी रोहें म्युनिसिपालिटीचा अध्यक्ष असतांना चहाची व्यवस्था मी केली होती व त्यावेळीं असाच प्रश्‍न निघाला होता. परंतु मी मेंबराना असें स्पष्ट सांगितलें कीं चहा सर्वांसाठी केलेला आहे. ज्यांना घ्यावयाचा असेल त्यांन एकत्र घ्यावा. ज्यांना एकत्र घ्यावयाचा नसेल त्याच्या करितां वगळो सोय करतां येणार नाहीं. त्याप्रमाणें ज्यांची हरकत नव्हतो त्यांनी एकत्र चहा घेतला व ज्याची हरकत होती त्यांना चहा मिळाला नाहीं. “ रा. भाटे यांनीं आपलें उदाहरण सांगितलें तरी सोवळ्या सभासदांना सडेतोड सागण्याचें धैर्य अध्यक्षाना झालें नाहीं. शेवटी भातणकर यांनीं शिपायाकडून बाहेरील चहा चिवडा विकत आणविला. अशी खरी हंकीकत आहे. यावरून, राष्ट्रीय गप्पा मारणारे व खादी वेष धारण करून मिरविणारे लोकच कसा आगलावेपणा करितांत तें दिसून येईल.

के ®

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९.