भोजन भस्कराचा उर्मटपणा - Page 177

43
भोजन भास्कराचा उर्मटपणा

` * भाला “ कार भोपटकरांनीं सालाबादप्रमाणे या वर्षीहि पुणें येथें लोकमान्य भोजनाचा समारंभ घडवून आणला. या भोजनाची जाहिरात आपल्या वर्तमान पत्रांतून देतांना, लोकमान्यपंथी स्पृश्य लोकांचेंच हें जेवण आहे ; असे म्हणून न थांबता ' या भोजनांत अस्पृश्यांना घेतलें जाणार नाहीं ' असें आणखी मुद्दाम जाहीर केलें होतें. लोकमान्यपंथ व त्याची शिकवण बहिष्कृत वर्गाला माहिती आहे व या भोजनामध्यें भाग घेण्यास कोणीही बहिष्कूतवर्गीय इसम उत्सुक असण्याचा संभव नव्हता. "शिवाय, रोटी लोटीबंद ' भाला ' कारांच्या पुढारीपणाखालीं होणाऱ्या भोजनसमारंभांची बहिष्कृतांना कल्पना नव्हती असेंहि नाहीं. परंतु, बहिष्कृतवर्गांचा उर्मटपणानें मुद्दाम उपमर्द करण्याची संधी या भोजनभास्करानें वायां जाऊं दिली नाहीं: जातीचाच प्रश्‍न निघाला, तेव्हां पुण्याहून बहिष्कृतवर्गाच्या : एका गृहस्थानें ' विविधवृत्ता ' ला लिहून कळविलें कीं, ' फुकटच नव्हे तर वर चार चार आणे दक्षिणा देऊं करूनहि या भोजनाला अस्पृश्यांना बोलाविले असतें तरी तेथें कोणीं गेला नसता. ' भाला ' कारांचें जालीम ब्राह्मण्य आम्हांस माहित नाहीं कीं काय ? त्यांच्या घरी जेवावयास जावयाला आमचे जीव कांहीं वर आले नाहीत ! ” नरमेध हा नरमांसभक्षण पद्धतीचा अवशेष आहे. नरमेध उघडपणें करतां येइना तेव्हां भोजनांत विष घालून माणसें मारण्याचा पर्याय निघाला. या नरमेधांत जांवयास विष घालून मारणे हें सर्वात पुण्य कृत्य समजलें जात होतें. कोणत्याहि अस्पृश्य म्हटलेल्या जातीसंबंधाने अशा नरमेधाचा प्रवाद नाहीं. कोणत्या एका हिंदु जातीसंबंधानें असेल तर ती ' भाला -कारांची जात होय. मनुष्यमांस भक्षकांनां हल्लीं खिस्ती लोक आपल्या धर्माची दीक्षा देऊन सुधारतात. या देशांत प्राचीनकाळी वैदिक धर्माच्या प्रचारकांची ते काम केले,

परंतु त्य़ा मूळ स्वभावाचा अवशेष राहिला असें लोकप्रवादावरून दिसतें. मनुष्यमांस

भक्षकांच्या (Cannibals) वंशजांच्या पंक्तीला बसून ठेवण्यात भूषण आहे असें

कोणत्या अस्पृश्याला वाटेल |

के के की

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता, १६ ऑगस्ट १९२९.