५४
वेंगुल्याचां सत्यनारायण
` सावंतंवाडीच्या" “ वैनतेय “ पत्रात पुढील बातमी प्रसिद्ध झाली आहे :---
(वेंगुर्ले)* येथील सधन चांभार रामा याला नवसाचा सत्यनारायण करावयाचा होता. वेंगुर्ले शहरी चांभारवाड्यात श्रीसत्यनारायणाची ही पहिलीच पूजा असल्यामुळे रूढिप्रिय स्थानिक.पुरोहित वर्गातून पौरोहित्य करण्यास कोणीच पुढें होइना. . . त्यामुळें कामळेरहून श्री. सीतारामपंत पटवर्धन मुद्दाम आले व त्यांच्या पीरोहित्याखालीं श्रीसत्यनारायणाची पूजा गेल्या आषाढपौर्णिमेच्या दिवशीं मोठ्या थाटानें पार पडली. : शहरांतील सर्व. वर्गातील-व जातींतील पुष्कळ. प्रतिष्ठित मंडळी VAL चांभार याचे. निमंत्रणावरून' प्रसादाला आला होती. . त्यांमध्ये किरातकर- श्री. मराठे; श्री. गुंडोबा जोशी," श्री: झाट्ये, श्री. पेठे मास्तर, ख्यालगिरीचे बुवा वगैरे मंडळी प्रामुख्यानें दिसत होती. श्री. शेट्ये व गावडे वगैरे मराठा समाजातील मंडळी आपलां भजनी मेळाही घेऊन आली होंती. त्या मेळ्याने सुस्वर भर्जनही केलें. हा समारंभ यशस्वी करण्याचे कामीं येथील खादी कार्यालयाचे व्यवस्थापक श्री. म. तु. वालावलकर यांनीं फारच मेहनत घतली... एकदां पायंडा पडला. असल्यामुळें यापुढें सत्यनारायणाच्या पूजा करण्यास चांभारबर्गाला-स्थानिक पुरोहित मिळण्याची अडचण पडणार नाहीं असें वाट्ते. ;: ज्या लोकांनीं वरील़-पुजासमारंभाला प्रत्यक्ष हजर राहून अस्पृश्यांविषयीं. सहानुभूति दाखविली. त्यांना-,ल्याचप्रमाणे रा. .प्रटवर्धन, .रा. वालावलकर प्रभृति अस्पृश्य वर्गातील" पुढारी:..मंडळीलां- आम्ही: धन्यवाद, देतों. -- परंतु वरील बातमीपत्राचा. लेखंक “जी आशाः प्रंदर्शित करतो ती आशा फलद्रूप झाली तर भिक्षुक वर्गाचा फायदा होऊन अस्पृश्यांच्या बोकांडी एका नवीन खर्चाची रूढि बसेल अंशी मात्र आम्हांस भींति वाटते ? ` शिवाय, सत्यनारायणांची पोथी बनावट आहे. तें प्रकरण स्कंदपुराणातल्या रेवाखंडातलें म्हणून भासंविलेलें आहे परंतु सदरील पुराणामध्ये खरोखर तें नाहीं. त्या पोथींतली ईश्वरविषयक कल्पना अगदीं हीन प्रकारची आहे. ' उलटपक्षीं, चोखोबा राय. रोहिदास
* जिल्हा सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)