आहे. एकाच विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दोन किंवा अधिक ठिकाणी मतप्रदर्शन केले असेल आणि त्यात भिन्नता असेल तर त्यातील कोणते मत प्रमाण मानायचे असा अभ्यासकांना प्रश्न पडू शकतो. अशावेळी खुद्द डो.बाबासाहेबांनीच याबाबतचा निकष देऊन ठेवला आहे. त्यांनी आपल्या थॉटस ऑन लिग्बीस्टीक स्टेटस् (भाषावार राज्यांविषयी विचार) या १९५५च्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे को, “जबाबदार माणसाला पुनविचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धैर्य असले पाहिजे. अर्थात शिकलेले न शिकलो आहोत असे त्याच्या होण्यामागे चांगली आणि पुरेशी कारणे असणे मात्र जरुर आहेत. विचारात कधी अंतिमतः नसणे शक्य असावे.” याच प्रस्तावनेत त्यांनी आपले कोणत्याही बिषयावरील दोन किंबा अधिक ठिकाणच्या प्रतिपादनातील कालानुक्रमे नंतरचे
असेल ते मत प्रमाण मानावे असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी बाबासाहेबांच्या समग्र
साहित्याची कालानुक्रमे मांडणी करणेही आवश्यक ठरते.
डॉ.बाबासाहेबांच्या सहका-यांचे डो. आंबेडकरविषयक लेखन, आठवणी, चळवळीचे दस्तावेज आणि समकालिनांच्या नोंदी असे मुबलक साहित्य उपलब्ध आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही गेल्या ५० वर्षात खूप लिहिले गेले आहे. लिहिले जात आहे. या सर्व साहित्याची सविस्तर वर्णन सूची असणारा डॉ.आंबेडकर महाकोष सिद्ध करण्याचा आमचा मनोदय आहे. दरम्यानच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंडाच्या नव्या आवृत्त्यांचेही काम चालू ठेबावे लागणारच. या सा-यांसाठी ही समिती कायमस्वरुपी असण्याचो नितांत आवश्यकता आहे. वास्तविक पाहता पहिल्या २४ वर्षात या बाबीकडे कसे लक्ष गेले नाही, याचेच नवल वाटते. समितीला दरवेळी १ वर्षाची मुदत दिली जाते. ती संपण्यापूर्वी मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी करावयाच्या प्रशासकीय बाबींमुळे मुदत संपल्यानंतर आठ दहा
महिन्यांनी नविन मुदतवाढ मिळते. तोवर जेमतेम दोन चार महिने शिल्लक राहिलेले
असतात. समितीच्या कार्यालयातील कर्मचा-यांच्या मुदतवाढीसाठी तर वर्षातून चार वेळा प्रस्ताब सादर करावे लागतात. कागदी घोडे नाचवण्याच्या या कामात संशोधन, प्रकाशन, अनुवाद यासारख्या सर्वांधिक महत्त्वाच्या कामांचा वेळ वाया
जातो.
(पंधरा)