गणेशोत्सवाच्या सार्वजनिकत्वाची व्याख्या - Page 180

५ ५

गणेशोत्सवाच्या सार्वजनिकत्वाची व्याख्या

गणेशोत्सव हा सार्वजनिक व राष्ट्रीय आहे असें म्हणण्यांत येतें. वस्तुतः

राष्ट्रीयत्वाचा त्यांत कांहीं संबंध नाही. गणेशोत्सव ही धार्मिक बाब असल्यामुळें आणि हिंदी राष्ट्रांत अंतर्भूत होणाऱ्या मुसलमान, पारशी वगैरे अन्यधर्मीयांचा या उत्सवांत कांहीं संबंध येऊं शकत नसल्याकारणानें त्या उत्सवाला राष्ट्रीय म्हणणे म्हणजे ' राष्ट्रीय ' शब्दाची नुस्ती थट्टा करणेंच होय. हिंदूंचा सार्वजनिक उत्सव असें फार तर म्हणतां येईल. बाकी ' हिंदु ' या शब्दाची हल्ली जी व्याख्या करण्यांत येतें तिला अनुसरून मूर्तिपूजा व पुराणें न मानणाऱ्या आर्यसमाजी व प्रार्थनासमाजी उर्फ ब्रह्मसमाजी लोकांचा त्याचप्रमाणें वैदिक धर्मात न समावणाऱ्या लिगायत, जैन, शीख व बौद्ध या पंथांच्या लोकांचाहि हिंदूंमध्ये समावेश केला जातो. या दृष्टीने गणेशोत्सव हा सर्व हिंदूंचाहि धार्मिक उत्सव आहे असें म्हणता येत नाहीं. परंतु या उत्सवाचे पुरस्कर्ते तो हिंदूंचा सार्वजनिक म्हणत असतात, आणि गर्मत ही कीं, सार्वजनिक उत्सव म्हणून त्यांत जातिभेद पाळला जातो. उत्सवाला सार्वजनिक म्हणावयाचें, सर्व जातींच्या हिंदूंकडून त्याकरितां वर्गणी घ्यावयाची आणि एका विशिष्ट जातीच्या लोकांनीं इतरांना तुच्छ लेखून उत्सवामध्ये वागवावयाचें. जातिभेद, स्पर्शास्पर्श वगैरे सर्व बंडे या उत्सवात चालूच ठेवावयाची, दादर येथें गेल्या वर्षापर्यंत अशा रीतीनें सार्वजनिक गणपत्युत्सव साजरा करण्यांत येई. गेल्या साली ब्राह्मणेतर व अस्पृश्य मानलेल्या जातींच्या मंडळीनें असल्या ढोंगी सार्वजनिकपणाला हरकत घेतली. त्यावेळीं स्वाभिमानी मंडळीचा जोर पाहून उत्सवाच्या वतनदार चालक मंडळीनें पडतें घेतलें त्यावेळीं जी तडजोड झाली होती ती सर्वस्वी समाधानकारक होती असे नाहीं. परंतु वतनदार चालकांना तूर्त इतका डोस पुरे आहे असें वाटून स्वाभिमानी मंडळीने विशेष आग्रह धरला नाहीं. तथापि, यावर्षी वतनदार चालकांनी ती तडजोडही धुडकावून लावून पुन: एकजात पेशवाई आरंभिली आहे ' उत्सवाला ' सार्वजनिक ' म्हणण्याचें, त्यांच्या करितां सर्व जातींच्या हिंदूकडून वर्गणी गोळा करावयाची आणि पुन: गणपतीला ब्राह्मणेतरांच्या पूजेचा किंवा नैवेद्याचा विटाळ होऊं द्यावयाचा नाहीं. जणू काय गणपती म्हणजे