गणेशोत्सवाच्या सार्वजनिकत्वाची व्याख्या १३९
भटजातीचा जातभाईच असे समजून त्याचा बंदोबस्त ठेवावयाचा ! ब्राह्मणांनी
आपल्या देवघरांत गणपतीला खुशाल वाटेल तितक्या सोवळ्यांत ठेवावें, परंतु सार्वजनिक गणपतीला ब्राह्मणांचा कैदखाना कशाला ? सोंवळ्या लोकांना इतरांचा संबंध खपत नसेल तर त्यांनीं आपल्या जातीपुरताच उत्सव करावा आणि दुसऱ्या जातींच्या माणसांकडून त्या उत्सवासाठी वर्गणी घेऊं नये. तसें ते करीत
' नसतील तर इतर जातींनीं असल्या तोतया सार्वजनिक उत्सवाला वर्गणी देऊं नयें, त्याच्यावर कडकडीत बहिष्कार घालावा. सार्वजनिक व धार्मिक उत्सव अशा रीतीनें करण्यापेक्षा न केलेले बरें. सांप्रत या उत्सवामुळें हिंदूंची एकी होण्याच्या ऐवजी त्यांच्यातली फाटाफूट वाढण्यास मात्र साहाय्य होत आहे, आणि हिंदु संघटनेच्या गप्पा मारणारे लोकच ही फाटाफूट वाढवीत आहेत ?
i
a
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९.