4G.
वर्तमानपत्रांतल्यां जाहिराती
पुष्कळ ' वर्तमानपत्रकर्ते द्रव्यलोभाला बळीं पडून आपल्या वर्तमानपत्रांत जाहिराती प्रसिद्ध करण्याच्या बाबतींत विधिनिषेध :बाळगीत नाहीं. मराठी वर्तमानपत्रांमध्ये औषधाच्या घाणेरड्या मजकुरानें भरलेल्या जाहिरातींचा सुळसुळाट पूर्वीपासून आहे. - बऱ्याचशा जाहिराती फसवेगिरीच्या. व कांहीं तर अनितीला उघड उत्तेजन देणाऱ्या, 'शरीरप्रकृतीची नासाडी करणाऱ्या, वाचकांच्या अनिष्ट वासनांचे उद्दीपन करणाऱ्या अशा असतात. तशाच कांहीं जाहिराती विलायती दारु, सूबधाच्या असतात. अशा जाहिराती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध न होणें हें सार्वजनिक हित दृष्ट्या सर्वथैव इष्ट आहे. नाशिक येथें याबाबतींत कांही वर्तमानपत्रकर्त्यांनी उपक्रम केला आहे. तो स्तुत्य आहे. त्या संबंधाची माहिती आमच्याकडे प्रसिद्धीसाठी आली असून ती आम्ही दुसरीकडे दिली आहे. त्या माहितीवरून, दारू व कामोत्तेजक औषधे यांच्या संबंधाच्या जाहिरातीवर सदर पत्रकर्त्यानी बहिष्कार घालण्याचें ठरविलें असल्याचें दिसून येते. देशावरील बहुतेक वर्तमानपत्रांत नवरा बायकोच्या एकमेकांना नोटीसा छापलेल्या असतात. कित्येक पत्रांत तर अशा नोटीसांखेरीज इतर मजकूर केवळ नांवाला असतो. या नोटीसांमध्येहि कित्येक वेळा अश्लील मजकूर असतो तोहि न येऊं देण्याची व्यवस्था झाली पाहिजे.
प्रासंगिक
w है | + प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९. - i