५
सापांत चांभार आहेत की
माणसांत साप आहेत ?
सापांमध्यं सुद्धां जाती आहेत !
ता. ३ जून १९२९ सोमवार रोजीं रात्रौ ८ वाजण्याच्े सुमारास. पेण यथील महारवाड्यांतील -पिठ्या महादू नावाचा एक महार बेशुद्ध स्थितीति दवाखान्यात उपचाराकरितां आणण्यांत आला. _ डॉ. कर्णिक यांनी; त्याला उपचार करण्यास सुरुवात केली असतां त्याला ताडे येऊ लागले. डॉक्टरसाहेबांनीं फौजदारसाहेबांना बोलावणें पाठविलें. .त्यांनीं ग्रेजन रोग्याची स्थिती पहाताच तर्क बांधला कीं. त्याला सर्प वगैरे कांहीं तरी विषारी जनावर लागलें असावें तो दारूनें ,झिंगलेला रोगी नव्हे: . लागलीच त्यांनीं. येथील .सर्पमांत्रिक रा. वासुदेवशास्त्री जोशी वैद्य यांजकडे बोलावणे पाठविलें .व दुसरे सर्पमांत्रिक रा. विष्णुपंत ओक यांचेकडे कडे पिठ्या महाराला रवाना केले. डा. कर्णिक हेहि जिज्ञासेनें तेथे गेले. तेथें रा. ओक यांनी मंत्रांचें पाणी मारून सर्व विष उतरविण्याचा प्रयोग केला. सर्प अंगात येऊन त्यांने आपली जात चाभार अल सांगितलें व शेवटीं रीतीप्रमाणे शपथ. घेऊन तो गेला. रा. वांसुदेवशास्त्री हे निरोप पोचून दवाखान्यात गेले व तेथून ओकांकडे गेले त्या वेळी दशित्त मनुष्य बरा होऊन आपल्या पायानें घरीं जाण्यास निघाला होता. पुढें थोड्या वेळाने शास्त्रीबोदा आपल्या घरीं आले लों आपल्या घरी पुनः पिठ्यास बेशुद्ध स्थितींत आणण्यांत आल्याचें पाहून त्यास चमत्कार वाटला. चौकशीअंती त्यांना समजलें कीं, पिठ्यां घरीं जालो न जातो तोंच त्यास पुनः ' लहर येऊन! ताडे येऊं लागले म्हणून आता त्याला त्यांच्याकडे उतरविण्याकरिता .आणलें आहे. त्यांनी लागलीच पाणी मारण्यास सुरुवात केली. डॉ. कर्णिकास त्यांनी मुद्दाम निरोप
` पाठवून बोलावून घेतलें
पाणी मारण्यास सुरवात होतांच सर्पाचा संचार दंशितांच्या आंगांत झाला तो
मंत्र्याच्याः आंगावर जाण्याकरिता त्वेषाने धडपडू 'लांगंलां. या त्वेषांत मांत्रिक
त्याच्या तडाक्यांत सांपडून त्यांने त्याला जर दंश केला तर मांत्रिकाचा निश्चित
मूत्यूच असल्यामुळें सर्पसंचार झालेल्या दंशितास फार सावधगिरीनें बांधूनहि ठेवावे
लागतें. पिठ्या महाराच्या आंगात मंत्राच्या पाण्याच्या माराने इतका त्वेष आला
* ' मांत्रिकाच्या ' असावे-संपादक.
बाय ६४% - १९