१४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
होता कीं त्याला आवरण्याकरितां १०-१२ माणसे लागली. सर्प त्याच्या आंगात आल्यानंतर पुढील प्रश्नोत्तरे झाली--
१ ' तूं काँ चावलास ? ' ' वेल ओढतांना मला ढका लागला म्हणून चावलों ' २ ' आतां कोठें आहेस ?“ ' जंगलांतच आहे '. ३ ' तुझी जात काय ? ' चांभार ' ४ ' तुला मघांशीं ओकांनीं पाणी घातले व तूं शपथ घेऊन गेलास, मग आतां पुन्हां कसा आलास ? ' ' मी त्यांना शपथ घेतांना फसविलें ' ५ 'मग आतां जातोस कीं नाही ? मलाहि पुन्हां फसवणार काय ? ' ' नाहीं, आतां खरेंच जातो. ' ६ ' तूं जातीचा चांभार आहेस तेव्हां तुला शपथ पायतणाची घेतली पाहिजे. ' ' घेतो. तुम्हीं सांगाल ती घेतों; ' ७ ' मघाशीं तूं पायतण हातानें उचलून शपथ घेतलीस व लोकांना फसविलेंस. -आतां तुला पायतण तोंडानें उचलून शपथ घेतली पाहिजे ' ' तशी शपथ मी घेतो . असें म्हणून आपल्या दांतांनीं त्यानें पायतण उचललें व मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणें ' जातो जातो ' असें एका दमांत न थांबतां म्हणून त्यानें जमिनिवर डोकें ठेवून शपथ रीतसर पुरी केली. लागलीच तो महार साफ शुद्धीवर आला व मंत्र्याने दिलेलें मंतरपाणी पिवून आपल्या पायांनीं हुशारीनें चालत घरी महारवाड्यात गेला. तेव्हांपासून आज तागायत तो खडखडीत बरा असून कामधंदा करीत आहे.
येथील सरकारी डॉक्टर मे. कर्णिक यांनीं वरील सर्व हकीकत समक्ष पाहिली असून, वरील सर्व मजकूर त्यांना दाखवूनच आम्ही प्रसिद्ध करीत असल्यामुळें त्याच्या खरेपणाविषयीं संशयाला जागा नाहीं. म्हणून मंत्रीशास्त्रावर अविश्वास करणाऱ्यांना आपण बरोबर किंवा चूक आहों याचा पडताळा पाहण्याला या हकीकतीचा विशेष उपयोग होईल अशी आशा वाटते: मनुष्यामधील जातीचे बंड मोडण्याला निघालेल्या सत्यसमाजिष्टांना अथवा. जातपात तोड़क मंडळांना, सरपटणाऱ्या प्राणिवर्गामध्येंहि जातीचें बंड आहे हें वरील समजूत हकीकलीवरून, तें कसें मोडावें याची नवी चिंता यापुढें उत्पन्न न होवो म्हणजे झाले.
' कुलाबा समाचार. '
सापांत चांभार आहेत कीं माणसांत साप आहेत ?
वरील सारख्या हकीकती मधून मधून कांहीं लोक प्रसिद्ध करीत असतात आणि त्यामुळे साधारण माणसांच्या मनांत भ्रामक समजुती उत्पन्न होतात किंवा आधीच असलेल्या तशा समजुती दृढतर होतात.
वरील हकीकती वरून पिठ्या महाराला साप चावल्याबद्दलची माहिती किंवा तसा संशय कोणास पूर्वी नव्हता कदाचित खुद्द पिट्यालाहि आपल्यास साप