१४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
होय. माणसांप्रमाणे सापांत जाती असतील तर पोटजातीहि कशावरून
नसतील ? कांहीं साप ' क्रुलाबा समाचार ' कर्त्याच्या जातीचे, कांहीं ' सुदर्शन
काराच्या जातीचे, कांहीं ' भाला ' काराच्या.. जातीचे असण्याचाहि संभव आहे. त्याप्रमाणे आहाराचे निर्बधहि. ते पाळीत. असतील. हे ब्राह्मण साप अर्थातच अंडी, बेडूक वगैरे खात नसतील, मात्र त्यांतल्या त्यांत ' सुदर्शन : काराचे जातभाई साप पाण्यात शिरून कदाचित पाणशेंगांचा फन्ना उडवीत असतील |
` क्रुलाबा समाचारांतील वरील हकीकत वाचून. साप वगैरे सरपटणाऱ्या प्राणीवर्गामध्ये सुद्धा जातीचें बंड आहे अशी आमची खात्री होत नाहीं. . मात्र त्या हकोकतीवरील समाचार.कर्त्यांची संपादकीय मल्लीनाथी वाचून माणसांमध्यें सुद्धा कांहीं सरपटणाऱ्या. प्राण्यांच्या जातींचे लोक आहेत ते आपल्या विषारी विचारांनी भोळसर लोकांची .विचारशक्ति पंगु करण्याचा प्रयत्न करितात या विषयीं आमची खात्री होऊन चुकली |
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९,