५८
अस्पृश्यांना मंदीर प्रवेश
(हिं. सं. च्या प्रचारकाकडून)
हिंदुसभेच्या कार्याचा प्रचार जिल्ह्यांत व्हावयास लागल्यापासून अस्पृश्यबंधूंविषयीं स्पृश्य हिंदूच्या ठिकाणीं कशा प्रकारें सहानुभूती उत्पन्न व्हावयाला लागली याचे प्रत्यंतर एलीचपुर * येथें नुकतेच घडून आलें आहे. एलीचपुरला सुलतानपुऱ्यामध्यें स्वामी विमलानंद यांनीं भिक्षेवर ८३,००० रुपये जुळवून एक सुंदर व प्रेक्षणीय दत्त मंदीर बरेचं दिवसापूर्वी बांधले आहे. wea मंदिराप्रीत्यर्थ नेमल्या गेलेल्या
' कमेटीच्या सभासदांनी
अस्पृश्यांना मंदीर खुलें करण्याचें ठरवून
तो संस्मरणीय प्रसंग ता. ३१ जुलै १९२९ रोजीं श्रीशेठ जमनालालजी बजाज यांच्या हस्ते घडवून आणला. माननीय श्रीशेठ जमनालालजी यांची दुपारी मिरवणूक निघून ज्या मंदिरांत अस्पृश्यांचा प्रवेश व्हावयाचा होता त्याच मंदिरासमोर स्पृश्यास्पृश्य हिंदूंची डॉ. पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होऊन श्री. विनोबाजी भावे व जमनालालजी बजाज यांची स्फूर्तिदायक भाषणें झालीं. सभा आटोपल्यानंतर जमनालालजी यांच्या नेतृत्त्वांखालीं सरासरी १०० अस्पृश्य बंधूंनी मंदिर प्रवेश केला आणि भक्तियुक्त अतःकरणानें देवदर्शन घेतलें. मंदिर प्रवेश होऊन देवदर्शन झाल्यानंतर अस्पृश्य बंधूंच्या मुखांतून हिंदुधर्मावर निष्ठा व्यक्त करणारी एक गगनभेदी आरोळी उठली व ती म्हणजे
' हिंदु धर्म कीं जय ' ही होय |
सायंकाळी स्थानिक हिंदु सभेमार्फत सभा होऊन नागरिकांनी माननीय जमनालालजी यांना मानपत्र अर्पण केलें व अशा रीतीनें झालेल्या प्रकाराबद्दल
आपली सहानुभूति व्यक्त केली. सदरहू प्रसंगाला श्री. दास्तानें वकील, सत्यदेव
विद्यालंकार, डॉ. भोजराज, डॉ. सबनीस वगैरे मंडळो हजर हाती.
जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यांतून हिंदुसभा प्रेमी लोकांनीं तूर्त निदान एक तरौ
मंदीर अस्पृश्य बंधुंकरितां gel करण्याचें ठरविले तर अमरावती जिल्ह्यांत
अस्पृश्यता नष्ट व्हावयाला कितीसा काळ लागणार आहे ? सद प्रसंगीं
त प र स CVSS Fe es ee नि सि चाच
* जिल्हा अमरावती (महाराष्ट्र)