१९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
श्रीस्वामी विमलानंद व मंदिराच्या कमिटीचे सभासद यांनीं जी मनाची उदारता दाखविली त्याबद्दल त्यांचे कोण अभिनंदन करणार नाहीं.
नवा काळ.
मुंबईच्या हिंदुमहासभेचे लोक आपली पोकळ बडबड सोडून अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला मनापासून लागतील तर मुंबईतही मंदीर प्रवेश होण्यास विलंब लागणार नाहीं. पण त्यांच्या मनांतून अस्पृश्यता निवारण करण्याचें नाही. तोंडपाटीलकी करून मोठेपणा घेऊन जगांत अस्पृश्यता निवारणाचा डांगोरा पिटावयास पाहिजे एवढेंच त्यांचे कार्य होय. अस्पृश्य वर्गातील एखादा माँग, चांभार किंवा महार ज्याला कोठें आपला लब्धप्रतिष्ठितपणा मिरवावयास मिळत नसेल तो आपल्या बाजूला वळला किंवा आपल्या पंखाखांलीं आला म्हणून गंगेत घोडे न्हाले असें समजूं नये तर खरें भरीव कार्य करून दाखबावें. इच्छा असली तर मार्ग सांपडतो. संभांत पास होणाऱ्या कागदी ठरावांनीं काम होत नसतें. या पुढें तरी मुंबईचे हिंदु महासभावाले अंतःकरणा पासून कामाला लागतील आणि “ बोले तैसा चाले ” या साधुक्तीची सत्यता पटवितील काय ?
सं. ब. भा.
rere ०“ वन - a reenter, a बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९.