आमची कैफियत - Page 189

५९
आमची कैफियत

या जगात सर्वांचे समाधान करणें कोणाला शक्य नाहीं. सर्वाचे समाधान करण्याचा जो कोणी प्रयत्न करील त्याच्या हातून कांहीच व्हावयाचे नाहीं. त्याचप्रमाणें या जगांत ' अजातशत्रु ' कोणी नाही. युधिष्ठिर धर्मराजाला ' अजातशत्रु ' अशी संज्ञा दिलेली आहे. स्वतः धर्मराजा कोणाशी शत्रुत्व करीत नव्हता, या दृष्टीनें तो अजातशत्रु होता; परंतु त्याच्याशीं शत्रुत्व करणारे दुर्योधनासारखे त्याचेच भाऊबंद होते. सार्वजनिक कामांत पडणाऱ्या माणसाला तर सर्वांचे समाधान करणें अशक्य असतें आणि कोणी सार्वजनिक कार्यकर्ता लोकसंग्रहाची भलतीच व्याख्या करून सर्वांचे समाधान करण्याच्या फंदात पडेल तर त्याला. वर म्हटल्याप्रमाणे म्हणण्यासारखे कांहीं काम करता येणार नाहींच, परंतु त्याशिवाय त्याला तत्त्वनिष्ठा सोडावी लागेल. आम्ही जेव्हा सार्वजनिक कार्यात पडलों तेंव्हा, आमच्यावर कोणाची टीका होणार नाहीं अशी आमची मुळीच अपेक्षा नव्हती. कदाचित्‌ त्या वेंळीं, सार्वजनिक आयुःक्रमाच्या महासागरांतील अंतर्गत प्रवाह व आडवे प्रवाह (undercurrents and crosscurrents) यांच्या संबंधानें आम्हास पुरेशी कल्पना नसेल, कदाचित्‌ त्या वेळीं आम्ही इल्लींपेक्षा विशेष

आशावादीही असूं ; परंतु-सार्वजनिक आयुःक्रम म्हणजे एक प्रकारचे रणांगण आहे, त्यात प्रतिपक्षाबरोबर दोन हात केलेच पाहिजेत आणि एका बाबतीत मित्र असणारे

दुसऱ्या बाबतीत शत्रु होण्याचा संभव असतो, है मात्र आम्ही पूर्णपणे जाणून

होतो. अर्थात आमच्यावर वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रसंगी

जी टीका होते त्याबद्दल आम्हास आश्चर्य वाटत नाही. आमच्या अंगीकृत

तत्त्वांवर आमची पूर्ण श्रद्धा आहे, आमच्या हेतूच्या पावित्र्याबद्दल आमची पूर्ण खात्री

आहे, म्हणून आम्हाला आमच्यावर होत असलेल्या टीकेबद्दल age वाटत

नाहीं. प्रतिकूल परिस्थितीमुळे निराशेचा पगडा केव्हां केव्हां मनावर बसूं पाहतो,

परंतु अद्यापि तरी तो आम्ही आमच्या मनावर बसूं दिलेला नाहीं. आमच्या हातून

चुका होत नाहींत असं आमचें म्हणणें नाहीं आणि आमच्या चुका खरोखर प्रामाणिक

बुद्धीनें जर कोणी दाखविल्या तर त्याचा आम्हाला मुळीच विषाद वाटत "नाही,

इतकेंच नव्हे तर तशा माणसाचे आभार मानून त्याच्या टीकेचा विचार करण्यास

आम्ही सदैव तयार असतों. मनुष्यसमाजात सर्वज्ञ व अस्खलनशील असा कोण

आहे? असो. आमच्या टीकाकारांचे अनेक वर्ग करतां येतील, काहीं