आमची कैफियत - Page 191

आमची कैफियत १४९

एवढ्याचसाठीं. हिंदूंचे संख्याबळ कमी होऊं नये, वाढवितां आलें तर वाढवावें, याच एका हेतूने ते प्रेरित झालेले असतात. सामाजिक न्याय, समता व बंधुता याची त्यांना काही किंमत वाटत नाही. बहिष्कृतांना नुसते चुचकारून ठेवावयाचें, त्यांच्या डोळ्याला उगीच पाणी लावावयाचें आणि बाह्यात्कारी

आपलेपणा दाखवून हक्कांचा प्रश्‍न निघाला म्हणजे त्यांच्या तोंडाला पाने पुसावयाची हें हिंदुमहासभावाल्यांपैकीं बहुतेकांचे धोरण आहे. बहिष्कृत वर्गातले लोक आपल्या ताटाखालचीं मांजरें व्हावी असा त्यांचा अंतःस्थ हेतू असल्याकारणानें बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ त्यांना खपत नाही, त्या चळवळीचा ते द्वेष करितात आणि त्था चळवळीत पुढाकार घेणाऱ्या लोकांना ते आपल्या शत्रूप्रमाणें लेखतात. बहिष्कृतांनी स्वयंस्फूर्तीने काही चळवळ करूं नये, आपल्या गोडगोड थापा डोळे मिटून खऱ्या मानाव्या, माणुसकीच्या हक्कांची मागणी करू नये, मागणी केलीच तर ती हक्क म्हणून नव्हे तर याचना म्हणून करावी, जातिभेदाच्या पोलादी चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये आणि ज्या कांहीं किरकोळ सवलती मेहरबानी म्हणून वरिष्ठ वर्गातले लोक त्यांच्या तोंडावर टाकतील त्यातच समाधान मानून राहावे व त्याबद्दल कृतज्ञ असावे, अशी या ढोंगी हिंदुसंघटनावाद्यांची इच्छा असते. दुसरे कित्येक सुधारणावादी मतांचे परंतु विशिष्ट धर्मपंथांचे व मूर्तिपूजेचा निषेध करणारे लोक आहेत, त्यांना देवळांत जाण्याच्या हक्कासंबंधाने अस्पृश्यांनी चळवळ करणें पसंत पडत नाहीं. त्यांना वाटतें कीं अस्पृश्यांनी प्रार्थनासमाजिस्ट किंवा आर्यसमाजिस्ट व्हावे. HEM ब्राह्मणेतरांना बहिष्कृतांच्या चळवळीने ब्राह्मणेतर चळवळीची कास धरून चालावे, ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी म्हणतील तसे अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी वागावें, बहिष्कृतांच्या चळवळीवर ब्राह्मणांची मग ते उदारमतवादी असले तरी त्यांची दुरून सावलीही पडूं देऊ नयें आणि ब्राह्मणेतर पुढारीच आपल्याला सुस्थिति प्राप्त करून देतील असा दृढ भरव॑सा बाळगून स्वतंत्र चळवळीच्या भानगडीत पडूं नये, असें वाटतें, ही बहिष्कृतवर्गाबाहेरील लोकांची गोष्ट झाली. आता खुद्द आमच्याच वर्गातले आमचे जे आक्षेपक आहेत त्यांच्याकडे पाहिलें तर असें दिसून येइल कीं, काँही लोक जातिभेदानें किंवा मत्सराने प्रेरित झालेले आहेत व काही वैयक्तिक कारणांमुळे असंतुष्ट आहेत. बहिष्कृतवर्गात अनेक जाती व पोटजाती आहेत. आपली जात आणि त्यातही आपली पोटजात बाकी बहिष्कृतांपेक्षा श्रेष्ठ

असें समजणारे. व आपल्या जातभाईंना तसे सांगून त्यांना आपला सवता सुभा

स्थापण्याचा उपदेश करणारे काहीं लोक आहेत. बहिष्कृतांच्या सव॑ वर्गांची

एकच चळवळ करणें म्हणजे ' सबगोलंकार ' करणे आहे, अस्पृश्यता दूर होण्यास

कालावधी लागला तरी हरकत नाहीं, परंतु आपल्या पोटजातीचा सवता सुभा