१५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कायम राहिला पाहिजे, असे त्यांना वाटतें. सगळ्यांची एकच चळवळ झाली तर सबगोलंकार होऊन आपल्या पोटजातीला आपण इतर बहिष्कृतांपेक्षां वरिष्ठ दर्ज्याचे आहोंत असे सांगावयास वाव मिळणार नाहीं अशी त्यांना मिती वाटतें. शिवाय बहिष्कृतांच्या सर्व जातींची एकच चळवळ झाली तर आपल्यास सध्यां पुढारी समजणारे जातभाई दुसऱ्या जातीच्या पुढाऱ्यांचे अनुयायी होऊन आपण निर्माल्य होऊ हाही वैयक्तिक स्वार्थाचा विचार या सवत्या सुभ्याच्या खटपटीत अंतःस्थ वावरत असतो. दुसरे कित्येक लोक बहिष्कृतांचा पुढारीपणा ही आपली वतनदारीच आहे, हा आपला खासगी हक्कच आहे असें समजत होते, इतकेंच नव्हे तर या पुढारीपणाचा फायदा घेऊन समाजावर चरत होते.
लोक अज्ञानांत राहिले तरच आपला पुढारीपणा टिकेल असें त्यांना वाटणें स्वाभाविक असल्यामुळें समाजजागृति करणारी धडाडीची चळवळ त्यांना असह्य झाली तर त्यांत आश्चर्य नाहीं. आपली पुढारीपणाची वतनदारी गेलेली पाहून आमच्या चळवळीवर आडगोळ्या मारण्याचे काम त्यांनीं चालविलेलें आहे. दुसऱ्या कित्येक लोकांचा डॉ. आंबेडकर या व्यक्तिवर घुस्सा झालेला आहे व तें त्यांच्याशीं उघड किंवा प्रच्छन्न शत्रुत्व करूं लागले आहेत याचें कारण असें आहे कीं त्यांच्या खाजगी महत्त्वाकांक्षांचें समाधान करणें आंबेडकरांना शक्य झालेलें नाहीं. आंबेडकर आपल्या सामर्थ्याप्रमाणें सर्वांना मदत करावयास तयार असतात, परंतु सर्वाच्या खाजगी महत्त्वाकांक्षांचें समाधान करणें त्यांना शक्य नाहीं. आंबेडकरांनी नुसता रस्ता दाखवून उपयोगीं नाहीं, हातानें धरून चालवूनहि उपयोगीं नाहीं, तर त्यांनीं आपल्या खांद्यावर घेऊन गेलें पाहिजे ! आंबेडकरांनी कोणाकोणाला म्हणून खांद्यावर घेऊन जावें ? घरांत पाहुणे आले तर यजमान त्यांना जेवावयास वाढील, परंतु त्यानें स्वत:च्या हातानें आपल्या तोंडांत घांस घातले पाहिजेत असें जर प्रत्येक पाहुणा म्हणूं लागला तर यजमान त्यांचें कसे समाधान करूं शकेल ? आंबेडकरांना असें असंतुष्ट लोक अनेक भेटले आहेत व भेटत आहेत. खाजगी कारणामुळें आंबेडकरांवर राग झाल्यावर आंबेडकरांच्या चळवळींना नांवें ठेवावयाची, त्यांच्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करावयाचा, इतकेंच नव्हें तर बहिष्कृतांच्या स्वतंत्र चळवळीला पाण्यात पाहणाऱ्या लोकांना फितूर होण्यासहि कमो करावयाचें नाही, हे झाले शत्रुत्वाच्या नात्यानं आमच्याशी वागणाऱ्या लोकांचें. आतां दुसरा एक टोकाकारांचा वर्ग आहे. ते शत्रुभावानें टीका करीत नाहींत, त्यांच्या टीकेच्या मुळाशी प्रामाणिक मतभेद असतो हें आम्ही जाणून आहों. यातल्या कित्येक टीकाकारांच्या दृष्टीनें आमची चळवळ थोडीबहुत जहाल ठरते आणि दुसऱ्या वि.त्येकाच्या ad आम्ही मवाळपणानें वागतो. हे दोन्ही प्रकारचें टीकाकार आमचे