१५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
धक्का बसूं द्यावयाचा नाही, हें आमचें धोरण फाजील मवाळपणाचें आहे असें ज्या कोणास वाटत असेल त्याला तें तसें वाटो. परंतु या धोरणानें वागण्यात आमची चूक झाली किंवा आमच्या तत्त्वांच्या विरूद्ध आम्ही वागलों, असें आमची मनोदेवता तरी आम्हांस सांगत नाही. चळवळींत धडाडी पाहिजे हें जसें खरें आहे तसेंच,
डुकराच्या मुसंडीप्रमाणे, पुढच्या परिणामाचा विचार न करतां, धडाक्या मारीत सुटणें हें चळवळीचा घात करणारें आहे, हेंही खरें आहे, हें विसरतां कामा नये.
आम्हीं
मध्यम मार्ग
स्वीकारला आहे. मवाळपणा व जहालपणा या .दोन मार्गामधला हा मार्ग आहे. àd शौर्य व स्वतंत्र बाणा दाखविण्याचा हा मार्ग आहे, परंतु आलतायीपणाला, त्रागा करण्याच्या प्रवृत्तीला या मार्गात अवकाश नाही. फाजील मवाळ प्रवृत्तीचे लोक आमचे पाय मागें खेंचूं पाहतात आणि फाजील जहाल प्रवृत्तीचे लोक आम्ही खांच खळगे, कांटे न पाहतां धूम ठोकीत नाहीं म्हणून आम्हांला नांवें ठेवतात. स्वतः आमच्या व्यक्तीलाच धोका असता तर आम्हीं त्याचा तितकासा विचार केला नसता ; परंतु आम्हाला आमच्या चळवळीच्या सुरक्षितपणाचा व मजबुतीचा विचार केला पाहिजे. ज्या तत्त्वांच्या आधारावर आमच्या चळवळीची इमारत आम्ही उभारू पाहते आहों, त्या तत्त्वांना बाध न आणता देशांतील कोणत्याही पक्षांशी, समाजाशीं किंवा व्यक्तीशी सहकारिता करावयाला आमची तयारी आहे. आम्हाला जितकी सहानुभूति मिळेल तितकी थोडींच आहे ; परंतु आमच्या अंगीकृत तत्त्वांची किंमत देऊन कोणाची सहानुभूति विकत घेण्यास मात्र आम्ही तयार नाहीं. अशाप्रकारचा तत्वविक्रय नीतिशुद्ध तर नव्हेच, परंतु परिणामी तो इष्टही नव्हे. टीकाकारांपैकीं कोणत्याही एका वर्गाला संतुष्ट केलें तरी इतर वर्ग असंतुष्ट राहणारच, आणि त्यांजकडून टीका होणारच. अशा रीतीने एकाला संतुष्ट ठेवून बाकी सर्वाचे शत्रुत्व संपादण्याच्यापेक्षा अंगीकृत तत्त्वाप्रमाणे चालावे, मग कोणाचा रोष होवो किंवा संतोष होवो, हें धोरण
AAAS सुद्ध विशष फायद्याचे नाही काय ? आणखी एक मार्ग आहे. तो
सवाना खुष ठेवण्यासाठी लटपट करणे, एकाला एक व दुसऱ्याला दुसरेच भासदिण हा हाय परंतु तो आम्हाला शक्य नाहीं. शिवाय, तो मार्ग अदूरदशापणाचा आहे. एखादा मनुष्य कांहीं काळ सवे माणसांना fear कांहीं माणसांना सर्व काळ फसवूँ शकेल परंतु सर्व काळ सर्वांना फसविणें हें कोणालाच शक्य नाही
७७ ७
; के आरव CR rR SS