दत्तदरबारचे उदाहरण - Page 195

६ 0

दत्तदरबारचे उदाहरण

एलिचपूर येथील ' दत्तदरबार ' नांवानें प्रसिद्ध असलेल्या हिंदुदेवालयाची द्वारे बहिष्कृतांसुद्धां सर्व जातींच्या हिंदूंना उघडी ठेवण्याचा उपक्रम करण्यांत आला.& त्याची हकीकत दुसरीकडे दिली आहे.] सदरील देवालयाच्या कमिटीमर्ध्ये या सुधारणेस बहुमत अनुकूल होतें अर्थात थोडी मंडळी विरुद्ध होती ; तथापि सर्व ट्रस्टींची अनुकूलता होती. या बाबतींत शेट जमनालाल बजाज प्रभूति मंडळीने खटपट केली व त्या खटपटीला यश आलें ही मोठ्या संतोषाची गोष्ट होय. सदरील देवालय हें वऱ्हाड प्रांतांतील एक प्रमुख देवालय असल्यामुळे तें बहिष्कृताना मुक्तद्वार झाल्याचा अप्रत्यक्ष परिणाम इतर देवालयांवर होण्याचा संभव आहे. सदरील देवालय हें श्रीदत्तात्रयाचें मंदीर आहे ही विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कारण दत्तसंप्रदाय हा सोवळ्याओवळ्याचे व जातिभेद विषयक निर्बंध बाकी बऱ्याचशा संप्रदायांपेक्षां विशेष कडकपणाजें पाळणारा आहे. वारकरी सांप्रदायांत तितकें सोवळे ओवळे पाळण्यात येत नाहीं परंतु अद्यापि विठोबाच्या देवालयांच्या बाबींत जी सुधारणा झालेली दिसत नाहीं ती दत्ताच्या एका देवालयामध्यें अंमलांत आलीं हैं खरोखर विशेष होय. वास्तविकपणे पाहतां. दत्त हें दैवत स्वतः ted आहे असा प्रकार नाहीं. दत्तात्रेयाचा साक्षात्कार मलंगाच्या वेषानें एकनाथादि साधूंना झाल्याची वर्णने जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात आणि गुरुचरित्राच्या पोथीचा प्रसार होईपर्यंत दत्तसंप्रदायाला हल्लींचें कडक सोवळेपणाचें स्वरुप प्राप्त झालें नव्हतें असें म्हणावयास हरकत नाहीं. महानुभावपंथामध्यें कृष्ण व दत्त या देवतांची उपासना पूर्वीपासून चालू

असून महानुभावपंथाचा प्रसार महाराष्ट्रांतच नव्हे तर पंजाब अफगणिस्थानपर्यंत

असल्याचें आढळून येतें. सर्वांत जुनें मराठी वाडःमय महानुभावपंथांचे

आहे. या पंथांत दत्तोपासना चालूं असली तरी जातिभेदाचें व सोवळ्याओवळ्याचे

बंड त्या पंथांत नाहीं. अर्थातच, हल्लीचा सोवळा दत्तसंप्रदाय हा आधुनिक आहे

हें उघड सिद्ध होतें. एकाद्या देवाला कमी अधिक सोवळा करणें हैं भक्तांच्या

हातांत असते. भक्तांच्या समजुतीप्रमाणे देवाचें स्वरुप बनत असतें. भक्त

मंडळी स्वत:च्या समजुती आपल्या उपास्यावर लावीत असते. भकत सोवळे तर

^ मंदीर, ३१ जुलै १९२९ रोजी खुले केले गेले.

न पाहा, परिशिष्ट क्रमांक : ८