दत्तदरबारचे उदाहरण - Page 196

१५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

देवहि सोवळा, भक्त उदारमतवादी तर देंवहि उदारमतवादी, भक्त हिंसाप्रिय तर देवहि हिंसाप्रिय, भक्त लांचखाऊ तर देवहि लांचखाऊ, भक्त शीघ्रकोपी तर देवहि शीघ्रकोपी, असेंच सर्वत्र दिसून येतें. हिंदूधर्मातल्या भक्तांना बहिष्कतांच्या सावलीनें आपण विटाळूं असें वाटतें मग आपल्या देवाला विटाळाची बाधा होऊं नये याकरिता त्यांनीं त्याला कडीकुलपांत-घालून ठेवावें. बहिष्कतांचा वाराहि त्याला लागूं देऊ नयें, हें स्वाभाविकच होय. सारांश, देवाच्या नांवावर चालू असलेलें सोवव्न्या-ओवळ््यांचें बंड माणसांनींच उत्पन्न केलेले आहे. वऱ्हाडांतच कांहीं दिवसापूर्वी जमनादास पोतदार यांच्या श्रीराममंदिरांत1॑ देवदर्शन घेण्यास महार जातीची एक स्त्री गेली म्हणून तिकडील ब्राह्मणानीं तिला मारहाण करून तिच्याकडून माफीपत्र लिहून घेतलें, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. अनार्य शबरीची उष्टी बोरें खाणाऱ्या रामाला एकाद्या भाविक महार स्त्रीनें दर्शन घेतलें म्हणून विटाळ व्हावा आणि जणू काय राममूर्तीचा विध्वंस करण्यास आलेली राक्षसी होती म्हणून ब्राह्मणांनीं त्या गरीब श्रद्धाळ अबलेला मारझोड करावी हें त्या श्रीरामचंद्राचें दुर्दैवच नव्हे काय ? दिल्ली येथेंहि बहिष्कतांनीं हिंदूंच्या देवालयासध्यें जाण्याचा प्रयत्न केला असतां तिकडील सोवळ्या लोकांनीं आकाशपाताळ एक केलें अशी बातमी कांही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. हिंदूसमाजांतील जातिभेदाची व सोवळ्याओवळ्यांची साडेसाती देवालाहि कशी बाधत आहे तें या उदाहरणांवरून दिसतें. शेठ जमनालाल बजाज प्रभृति पुढाऱ्यांनी देवाच्या मागचें हें अस्पृश्यतेचे ग्रहण सोडविण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत ते खरोखरच हिंदुधर्मालाः उज्वल स्वरूप देणारे आहेत. रावणानें . तेहतीसकोटी देवांना बंदीत टाकलें होतें असें म्हणतात आणि प्रमुख रावण हा दशग्रंथी वेद्पांठी विद्वान ब्राह्मण होता. असेहि पुराणिक सागतात. पण आजकालच्या सोवळ्या रावणांनीं श्रीरामसुद्धां सर्व देवांना कडीकुलपांच्या देवळांत कोंडून त्यांना बंदींत घातलें आहे

$6
EE a की

& नागपुरातील एक दानशूर व भाविक गृहस्थ.

1 नागपूर शहरातील शनिवार पेठेत असलेले श्रीरामांचे प्रसिद्ध मंदीर : प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ६ सप्टेंबर १९२९.