६१
आतां हें चित्र पहा !
महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी शेठ जमनालाल बजाज प्रभृति मंडळीचे अस्पृश्यांच्या बाबतींत महात्माजींच्या शिकवणीला अनुसरून कसें वर्तन आहे. तें दत्तदरबाराच्या उदाहरणावरून दिसून आलें आहें. परंतु दुर्दैवाने महात्माजींची शिकंवण त्यांच्या सर्व अनुयायांच्या बाबतींत अशा रीतीनें फलद्रूप झालेली नाहीं, इतकेंच नव्हे तर स्वतःला महात्माजींचे अनुयायी म्हणविणारांपैकी बहुतेक लोक अस्पृश्यता निवारणाच्या बाबतींतील महात्माजींचा उपदेश धाब्यावर बसविणारेच (आहेत. बारडोली तालुक्यामध्ये महात्माजींचा कार्यक्रम पूर्ण रीतीनें अंमलांत आलेला असून त्या तालुक्याइतकी देशाच्या दुसऱ्या कोणत्याच मागाची आत्मिक प्रगति झालेली नाहीं असें म्हणण्यांत येतें. त्या तालुक्यांत खादीचा प्रसार सर्वत्र झाला असेल, सत्याग्रहाकरितां लागणारी शिस्त लोकांच्या अंगी बाणली असेल,
परंतु अस्पृश्यता निवारणाच्या बाबतींत मात्र तो तालुका कोरडाच आहे असे दिसून
येतें. सदरील तालुक्यांत मोता नांवाचा एक मोठा गांव असून तेथें मुंबई
शहरांतल्या एका उदार धनिकाच्या आश्रयानें चाललेला एक धर्मार्थ दवाखाना
आहे. या दवाखान्यावरील डॉक्टरच्या हातून एक मोठा भयंकर गुन्हा
घडला. तो इतकाच कीं, दवाखान्यात येणाऱ्या बहिष्कृत वर्गातल्या रोग्यांची
रोगपरीक्षा करण्याकरितां तो त्यांना शिवला ! त्यामुळें डॉक्टरच्या विरुद्ध भयंकर
काहूर माजलें आणि त्या बिचाऱ्याने जर गावातल्या लोकांना माफीपत्र लिहून
दिलें नसतें तर त्याच्या हातीं नारळच देण्यांत आला असता ! महात्माजींच्या
अनुयायांमध्यें जमनालाल बजाजसारखे लीक हे अपवाद होत. बाकीचे
अनुयायी अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत साधारणत: धाब्यांवर बसविणारेच
आहेत. महाराष्टांत ' भुताळ पक्षांतलें लोक गांधीजींच्या विरुद्ध असून त्यांना
जातिभेद व अस्पृश्यता यांचें भूत हिंदु समाजाच्या मानगुटीवर असेंच राहूं द्यावयाचें
आहे आणि त्यांनीच गांधी पक्षाला त्याच्या चरकाभक्तीवरून ' सुताळ ' असें नांव
दिलेलें आहे. महाराष्ट्रांतील भुताळ व सुताळ हे दोन्ही अस्पृश्यांच्या बाबतींत
जवळ जवळ सारखेच आहेत. 'नवा काळ ' व ' चित्रमय जगत् ' यांच्यामध्यें
गांधीपक्षाचा मोठ्या जोरानें पुरस्कार करण्यांत येतो, परंतु अस्पृश्यता निवारणाची
बाब मात्र अचूक वगळण्यात येते ! एकाद्या व्यक्तीला देवाप्रमाणें पूज्य मानावयाचे,
परंतु त्या व्यक्तीच्या उपदेशांतला आपल्यास आवडतो तेवढाच भाग घेऊन बाकी