६२
हरदासाचा ट्रेड युनियन !
दोन वर्षांपूर्वी मुंबई शहरांत कुमार विनयमंदीराचा (बहिष्कृत वर्गातील मुलांचा) मेळा सार्वजनिक गणपतीपुढें विशेषतः ब्राह्मण सभेच्या .गणपतीपुढें येऊ देण्यांसंबंधानें कडाक्याचा वाद माजला होता हैं आमच्या वाचकांना ठाऊकच आहे. सदरील मेळ्याला दुसऱ्या कित्येक सार्वजनिक गणपतीपुढें आपली पदें म्हणू देण्यांत आलीं, कित्येक चाळींतल्या उत्सव चालकांनीं तर त्या मेळ्याचा थाटाने सत्कार केलां, तें पाहून आतां जीर्णमतवाद्यांनी खुनशी धोरणाचा अंगीकार करण्यास सुरूवात केली आहे. उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये मेळ्याचा गायनाप्रमाणें व्याख्याने, प्रवचने, कीर्तनें, वगैरेचाहि अंतर्भाव होत असतो. म्हणून एका हरदासानें, अस्पृश्यांचा मेळा जेथें आणण्यांत येईल तेथील कीर्तनाचें आमंत्रण
आपण स्वीकारणार नाहीं असें जाहीर केलें. परंतु एका हरदासावांचून उत्सवांत
कोणाचें कांहीं नडणार नाहीं असें त्याला आढळून आलें तेव्हां दुसऱ्या कांहीं हरदासांनाहि त्यानें आपल्या कटांत ओढलें आणि आतां या पांच सहा हरदासांनी आपला ट्रेड युनियन या कामाकरितां स्थापला आहे असें म्हणतात ! जीर्णमतवादाचें ढोलकें बडविणाऱ्या या नामधारी पोटभरू हरदासांच्या उपद्व्यापांमुळें समाजसुधारणेची लाट आतां कांहीं थांबणें शक्य नाहीं. एका अर्था असले हरदास उत्सवांत कीर्तनें न करतील तरच बरें. कारण कीर्तनांत जीर्णमतवाद
प्रतिपादून भोळ्या भाविक लोकांची हे दिशाभूल करावयाचे. त्या अर्थी त्यांचा बहिष्कार म्हणजे ' सुंठीवांचून खोकला गेला ' या न्यायानें फायदेशीरच समजला
पाहिजे. जे कोणी उदार मतवादी हिंदुधर्माचे अभिमानी असतील त्यांनीं,
समाजसुधारणेचा सूर्यप्रकाश क्षितिजावर आलेला पाहून सुधारणा विरोधी घुबड़ें
Maia लपून राहिलीं तर त्याबद्दल मुळींच विषाद मानून घ्यावयास नको.
ata tact ea PIS DEP SS मम यल वक अकसर
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ६ सप्टेंबर १९२९.
लाय Ex? - ४३