आधी .कळस, मग पाया | १५९
मिळतात आणि बहुतेकांना गांवांत. शेतीचा आधार नसतो. बहुतेक सर्व हातावरील पोटाचे असल्यामुळें आणि गेल्या वर्षांतला सहा महिन्यांचा मोठा संप
आणि त्यानंतर आज या गिरणींत तर उद्यां त्या गिरणीत याप्रमाणें झालेले colgo किरकोळ संप यांच्या योगें कर्जाच्या पायीं जेरीस आलेले असल्याकारणानें या
खेपेस संपावर जाण्याचे व संपात टिकाव काढण्याचे त्यांना बिलकूल त्राण नव्हतें
Rg या गोष्टींचा विचार न करतां गि. का. यूनियनच्या पुढाऱ्यांनी इरेला पडून
मोठा संप पुकारला. त्याचा जो परिणाम व्हावयाचा तोच झाला. संप हैं कामगारांचे एक मोठें अस्त्र आहे, परंतु त्याचा उपयोग जपूनच करावयाचा
असतो. जी केवळ शुद्ध कामगारसंघाची चळवळ: असते तीमध्येंहि संप करावे
लागतात, परंतु त्या संपाचा उद्देश कामगारांची दुःखें दूर करून घेणें असतो. ` क्रांतिवादी चळवळींमध्ये कामगारांची दुःखें दूर करून घेणें हा दुय्यम उद्देश असून
मुख्य उद्देश क्रांतीच्या तयारीची तालीम देणें हा असतो. कामगार चळवळीमध्ये
कामगारांची आर्थिक स्थिति सुधारण्याकडे लक्ष्य देण्यांत येतें, परंतु क्रांतिवादी
चळवळीमध्ये कामगारांची आर्थिक स्थिति सुधारणे हें बाह्यतः दाखविण्याचे निमित्त
असतें आणि अंतःस्थ हेतु कामगारांमधील असंतोष वाढविणें आणि क्रांतिवादाला
त्यांचीं. मनें अनुकूल करून घेणें हा असतो. अर्थात् कामगारांची जितकी
goer होईल व त्यांचे जितके हाल होतील, त्यांच्यावरील जुलूम जितका
वाढेल, "तितकें क्रांतिवादाच्या . दृष्टीनें इष्ट असतें.. कारण वैतागल्याशिवाय
क्रांतीसाठी कोणी तयार होत नाहीं. ` अल्पकाळांत क्रांति होऊन आजची
समाजव्यवस्था पार बदलून जाईल आणि कामगारांचें राज्य अस्तित्वांत येईल असा
क्रांतिवाद्यांना भरवंसा असल्यामुळें त्यांना कामगारांच्या तात्पुरत्या हालांचें कांही
वाटत नाहीं. अशा प्रकारची झटपट क्रांति इष्ट व शक्य आहे असें ठरलें तर
क्रांतिवादी पुढाऱ्यांचें धोरण बरोबर आहे असेंच म्हटलें पाहिजे. परंतु
झटपट क्रांति शंक्य नांही व इष्टहि नाही
असें.आमचें प्रामाणिक मत आहे. . आजची समाजव्यवस्था समाधानकारक नाहीं
समाजांत संपत्तीची वांटणी अत्यंत विषम प्रमाणाने झाली आहे आणि मूठभर
लोकांच्या हातीं कोट्यावधि लोकांचे जीव पडले आहेत, याबद्दल वाद नाही. मतभेद
आहे तो समाजव्यवस्थेमध्यें जो फेरबदल घडवून आणावयाचा तो कोणत्या मार्गानी
याविषयींच जबर रोगावर जबर उपायच पाहिजे असतात हें खरें, परंतु त्याचा अर्थ
उपायाच्या नांवावर रोग्याला अपाय करावयाचा असा नव्हे. हिंदुस्थान देशाच्या
सध्याच्या परिस्थितींत कम्युनिझम कितपत इष्ट आहे, दांडगाईंनें राज्यक्रांति
घडवून आणणें कितपत शक्य आहे वगैरे गोष्टी आपण घटकाभर बाजूला ठेवूं