आधीं कळस, मग पाया ! ' |. १६१
काय? देशांतील सर्व भांडवल व सर्व जमीन समाजाच्या मालकीची आहे हे कम्युनिस्टांचे तत्त्व या देशांतील लोकांच्या विशेषतः जमीन ही समाजाची
मालकीची असून व्यक्तीची खाजगी मालकी तिच्यावर असतां कामा नये हैं तत्व या देशांतील शेतकरी लोकांच्या गंळीं सहज उतरेल अशीं कम्युनिस्टांची समजूत आहे काय ? रशियन शेतकऱ्यांच्याहि गळीं हें तत्त्व अद्यापि उतरलेले नाहीं व म्हणून त्या बाबतींत सोव्हिएट सरकारला तत्व सोडून तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागलें हैं प्रसिद्धच आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे या. 'देशांतील कामगारांनाःव शेतकऱ्यांना क्रम्युनिस्टांचीं तत्वें आज तरी रुचणें व पचणे शक्य नाहीं. कम्युनिस्टांचा आदर्श समाज अस्तित्वांत यावयाला बहुजनसमाजाची जी मनोभूमिका तयार झाली पाहिजे ती मुळींच तयार झालेली नाहीं. म्हणूनच कम्युनिस्टांची या देशांतील सध्याची चळवळ 'आधीं कळस मग पाया अशा प्रकारच्या विपरीत क्रमाची आहे असें आम्ही म्हणतों.
SOS
ogee SPEIRS Se Wo
अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. २७ सप्टेंबर १९२९.