६४
एकाक्ष हरिणाची गोष्ट !
इसापनीतीमध्ये एका हरिणाची गोष्ट सांगितली आहे. हें हरीण एका
डोळ्यानें आंधळें होते. आपल्या एकाक्षपणाचा फायदा घेऊन शिकारी लोकांनीं आपली सुलभपणें शिकार करूं नये याकरितां त्या रानांतल्या तळ्याच्या कांठी चरतांना फुटलेला डोळा तळ्याच्या बाजूस व धड डोळा जमिनीच्या बाजूस राहील याविषयीं तें खबरदारी घेई. त्यामुळें शिकारी लोकांचे प्रयत्न फुकटजात. ती गोष्ट एका पारध्याच्या लक्षांत आली आणि त्यानें-होडीत बसून तळ्यामध्ये जाऊन तेथून त्या हरिणावर नेम धरला. तळ्याच्या बाजूनें धोका नाहीं असें समजून निर्धास्तपणे चरणाऱ्या एकाक्ष हरिणाला पारध्यानें तळ्यांतून आपल्यावर नेम धरला आहे हें समजलें नाहीं व त्यामुळें अखेरीस त्याची शिकार झालीच. गेल्या गणेशोत्सवामध्यें पनवेल येथें जो प्रकार] घडला त्याच्यावरून इसापनीतींतल्या सदरील गोष्टीची आठवण झाल्याखेरीज राहत नाहीं. पनवेलच्या जीर्णमतवाद्यांनीं तेथल्या तब्न्याच्या देवघाटावर अस्पृश्यांच्या गणपतींचे विसर्जन करण्यास या वर्षी हरकत घेऊन सरकारची पायधरणी केली. कांहीं भटजींनी कित्येक लोकांची मलतीच समजूत करून देऊन आपल्या बाजूस त्यांच्या सह्या घेतल्या, परंतु देवघाटावर अस्पृश्यांच्या गणपती विसर्जनास आपली हरकत नाहीं असें शेंकडों लोकांनीं उलट सरकारला कळविलें, तेव्हां देवघाटावर जाण्यास बल्लाळेश्वराच्या देवळाकडून जो एकच रस्ता आहे तो देवळाच्या खाजगी मालकीचा आहे असें सांगून सोवळ्या मंडळींनें मामलेदाराकडून त्या रस्त्याने गणपती नेण्यास मनाई असल्याबद्दलचा हुकूम बजावला. we व देवघाट हीं खाजगी नसलीं तरी देवघाटावर जाण्याचा रस्ता खासगी ठरवून टाकला म्हणजे अस्पृश्यांना आपोआप शह बसेल अशी सोवळ्या मंडळीची समजूत होती म्हणून त्यानीं वरील युक्ति लढविली होती. परंतु ही त्यांची युक्ती अखेरीस फसली | बहिष्कृत वर्गाचे गणपती, पनवेल म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष श्री आत्माराम शेठ आटवणे यांच्या गणपतीबरोबर होडीत बसवून देवघाटावर नेण्यांत आले व तेथें मोठ्या थाटानें विसर्जन समारंभ करण्यांत आला. अशा रीतीनें दुराग्रही सोवळ्या लोकांची एकाक्ष हरिणाप्रमाणें अखेरीस फसगत झाली! गेल्या वर्षी बहिष्कृतांच्या गणपतीचे देवघाटावर विसर्जन करण्यांत आलें होतें व त्या वेळीं कोणी हरकत घेतली नव्हती
DS
EN
. | पाहा परिशिष्ट क्रमांक : १०