६८
feg संस्कृतीचा बागुलबुवा
थोड्या दिवसांपूर्वी नायगांव येथें सत्यनारायणाच्या पूजेचा समारंभ झाला त्या वेळीं ब्राह्मण, मराठे वगैरे स्पृश्य आणि महार, मांग, चांभार वगैरे बहिष्कृत मानलेले लोक यांचे एकत्र सहभोजन झालें. या सहभोजनामध्यें भाग घेणारांमध्यें डॉ. सावरकर, रा. सुरतकर, डॉ. उदगांवकर वगैरे हिंदुमहासभावाले गृहस्थ होते. सदरील सहभोजनाची इत्यंभूत हकीकत प्रसिद्ध झाल्यावर, सदरील स्पृश्य हिंदूंना धमकावून व जबरीनें सहभोजनामध्यें भाग घेण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर सदरील सत्यनारायणपूजेच्या वेळीं झालेल्या भाषणांमध्ये कांहीं समतावादी TRU सत्यनारायण व गणपति या देवतांची निंदा केली, अशी बातमीहि हिंदुसमाजाचीं मर्ने समतावादाच्या चळवळीविरुद्ध चिथावण्याच्या उद्देशानें येथल्या एका जीर्णमतवादी पत्रानें प्रसिद्ध केली होती. त्यावर त्याच पत्रांत डॉ. उदगांवकर व रा. धडफळे यांनीं धमकावणी व जबरी यांच्यामुळे आपण व आपल्या बरोबरच्या इतर स्पृश्य हिंदूंनी सहभोजनांत भाग घेतला हें खोटें असल्याबद्दल कळविलें आहे. त्याचप्रमाणें सदरील पूजेच्या वेळीं समतावादी मंडळी आली होती ती ' बंडखोरपणा करण्यास ' आली होती, हेंहि सत्याला सोडून आहे असें वरील उभय गृहस्थानीं जाहीर केलें आहे. समतासंघाच्या नांवानें वेळीं अवेळीं बोटें मोडणाऱ्या या पत्रकाराचा खोडसाळपणा अशा रीतीनें परभारें शाबीद झाला, तेव्हां त्यानें हिंदु संस्कृतीची ढाल पुढें करून अस्पृश्यांना धमकी दिली आहे. सहभोजनानंतर मिश्रविवाहाचा प्रश्न येईल आणि महारचांभारलोक ब्राह्मण वगैरे हिंदूंपाशीं लग्नासाठी त्यांच्या मुली मागतील आणि अशा रीतीनें सबगोलंकार झाला म्हणजे हिंदुसंस्कृति रसातळाला जाईल, त्यापेक्षा हिदुसमाजांतून अस्पृश्य लोक बाहेर गेले तरी बेहत्तर, असें या जीर्णमलवाद्याचें म्हणणें आहे. जणूं काय, जातीतल्या जातींत तरी एकाची मुलगी दुसऱ्यानें मागितली म्हणजे त्यानें दिलीच पाहिजे असें कोठें आहे ! हिंदु संस्कृति म्हणजे काय, तिचें वैशिष्ट्य कशांत आहे, हें तरी एकदां या जीर्णमतवाद्यानीं जाहीर करावें. हल्लीं शारदा बिलाच्या विरुद्ध हाकाटी करणाऱ्या लोकांच्या मतें हिंदु संस्कृतीचे अर्थात् हिंदुधर्माचें वैशिष्ट्य, पाळण्यांत असल्यापासून आठदहा वर्षाचे वय होइपर्यंत मुलीचें लग्न करण्यांत आणि कोवळ्या वयाच्या पोरींना गर्भाधानाच्या खोलीमध्ये ढकलण्यांत आहे. एका काळीं हिंदु संस्कृति चक्री पागोटीं क रेशमी