६९
पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण
गेल्या आगष्ट महिन्याच्या २७ तारखेला रा. ल. ब. भोपटकर यांनी पर्वती येथील देवस्थानाच्या पंचांना “देवस्थानाच्या आवारांत स्पृश्यास्पृश्य भेदभाव यंदापासून नष्ट करावा व सर्व देवस्थान व देवता सर्व हिंदुधर्मीयांना खुल्या कराव्यांत व त्यांच्या धन्यवादाचें धनीं व्हावें ” अशी एका जाहीर पत्राच्या द्वारे विनंती केली] हैं पत्र रा. भोपटकर यांनीं पुणें येथे ब्राह्मण वर्गानीं चालविलेल्या अस्पृश्यता निवारण मंडळातर्फे लिहिलें होतें असें समजतें. कोठेंच कांहीं नसताना एकाएकीं सोवळ्या लोकांच्या काळजाला हात घालणारी अशी ही मागणी अस्पृश्यता निवारक मंडळाने केलेली वाचून आम्हांस मोठाच आचंबा वाटला. आणि चौकशीअंती असें समजलें कीं, पत्र लिहिण्यापूर्वी पुणें येथें राजकारणांत वावरणाऱ्या कांही ब्राह्मण गृहस्थांनी महाराष्ट्रांतील आपल्या जात भाईची, अस्पृश्यता निवारणा संबंधी आपणांस काय करतां येईल याचा विचार करण्याकरितां एक खाजगी बैठक भरविली होती व त्या बैठकीत ज्यांनी त्यांनीं आपापल्या ठिकाणची देवळें अस्पृश्यांना खुली करण्याचा प्रयत्न करावा असें ठरविण्यांत आलें होतें. रा. भोपटकर यांनी लिहिलेलें पन्न सदरहू बैठकीतील ठरावाचाच परिणाम असावा असा आमचा तर्क आहे. कसेहि असो अस्पृश्यता निवारक मंडळानें एक जबर कार्य आपखुषीनें व जाणूनबुजून आपल्या उरावर घेतलें हें निर्विवाद आहे व त्याच्या निष्पत्तीकडे सर्व लोकांचे डोळे साहजिकपणें लागून राहिलें होतें. बराच काळ लोटला तरी पण पर्वतीच्या पंचांनी वरील मागणीस कांहीं एक उत्तर न देतां मुग्धता स्विकारिली. पंचा कडून कांहींच उत्तर येत नाहीं, असें पाहून पुणें येथील अस्पृश्य वर्गनेंही आपणास पर्दतीचें देवालय खुलं असावें अशी प्रत्यक्ष मागणी केली. त्या मागणीला दुजोरा मिळावा म्हणून पुणें येथील युवक संघानेंही विनंती वजा पत्र लिहिलें. तरीही पंचांना वाचा फुटली नाहीं. या मुग्धतेचा अर्थ पंच आपल्या मागणीस कबूल नाहींत असें जाणून पुणें येथील अस्पृश्य वर्गातील पुढाऱ्यांनीं आपली मागणी तडीस नेण्यासाठी जरूर तर आपण सत्याग्रह करूं अशी जाहिरात दिली. तरी पण पर्वतीच्या पंचांनी हूं का चूं केले नाही. अखेर ता. २-१०-२९ रोजीं पंचांनी अस्पृश्य वर्गातर्फे
† पाहा परिशिष्ट क्रमांक : ११