पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण १७१
स्पष्ट खुलासा तीन दिवसाचे आंत करावा अशी जाहीर नोटीस देण्यांत आली. या थराला जेव्हां गोष्ट गेली तेव्हां अर्थात पंचांना स्तब्ध बसणें अशक्य झालें आणि म्हणून त्यांनीं ता. ८ ऑक्टोबरच्या केसरीत आपला खुलासा जाहीर रीतीनें सर्वाना कळविला, त्यांत "सदरहू देवस्थान पंचकमिटीच्या खाजगी मालकीचे आहे, ज्या श्रीमंत बाळाजी बाजीराव उफ नाना साहेब पेशवे यांनीं तें बांधलें तें त्यांनीं आपल्या खाजगीं खर्चाने बांधलें त्यांत अस्पृश्य वर्गास, तें हिंदुधर्मीय असले तरी इतर उच्च वर्णीय हिंदु वर्गाला देवळांत जेथवर जातां येतें तेथवर जाण्याचा हक्क नाहीं व तशी आजपर्यंत वहिवाटही नाहीं व सदरहू देवस्थानाची व्यवस्था पंचकमिटोकडे ट्रस्टी या नात्यानें असल्यामुळें मूळ संस्थापकाच्या हेतू बाहेर कोणतंही कृत्य करण्याचा कोणत्याही पंचास बिलकूल अधिकार पोहोचत नाहीं''. अशी कारणें देऊन आपल्याला ही मागणी मान्य करतां येत नाहीं म्हणून सांगितले. हा खुलासा प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यांतील अस्पृश्य .वर्गाला सत्याग्रहाचा उपाय अमलांत आणणें प्राप्त झालें व त्या प्रमाणें त्यांनीं गेल्या महिन्याच्या ता. १३ रोजी पर्वती येथें सत्याग्रह केला.1
पुणेरी कर्मठांची गुंडगिरी.
या सत्याग्रहात विरूद्ध पक्षाच्यातफं कोणकोणते अनन्वित प्रकार घडले याचे निरिक्षण केलें असतां पुणें म्हणजे एक बदमाषांचा अड्डा व लबाडांची पेठ आहे असेंच म्हटलें पाहिजे. पुण्याच्या सत्याग्रहांत † कायते १००-१५० लोकच होतें. एवढ्याशा अल्पसंख्याबलावर इतक्या मोठ्या कार्याची उभारणी करण्याचें साहस करणाऱ्या पुण्याच्या अस्पृश्य लोकांवर हात टाकण्याऐवजी त्यांचें कौतुक करणेच योग्य झालें असतें. शिवाय हा सत्याग्रह अगदीं शांततायुक्त होणार असे पूर्वीच जाहीर झालें होतें. सत्याग्रहांत येणाऱ्या लोकांनी हातांत काठ्या घेऊ नयेत व छत्र्या देखील घेऊ नयेत अशी एक अट घालण्यांत आली होती व ती अक्षरश: पाळण्यातहि आली होती. असें असतां १००-१५० सत्याग्रही लोंकांना नामोहरम करण्यासाठीं पांचसहा हजार स्पृश्य लोकांचा जमाव गोळा करून सत्याग्रही लोकांवर हात टाकावयास लावून त्यांच्यावर दगडांचा, विटांचा व वहाणांचा वर्षाव करावयास सांगून प्रतिकार न करण्याचा निर्धार ज्यानीं पूर्वीच जाहीर केला होता, अशा सत्याग्रही लोकांवर हल्ला करण्यास प्रवृत्त होणें यासारखा आसुरी प्रकार इतरत्र कोठें पहावयास सांपडेल किंवा नाहीं याची मोठी शंकाच आहे. या दांडगाईखोर लोकांना आमचें असें सांगणें आहे कीं ते अस्पृश्यांच्या सत्याग्रहाच्या बाबतींत जर सशस्त्र प्रतिकाराचा अवलंब करतील तर अस्पृश्यांच्या सत्याग्रहाच्या
1 पाहा. परिशिष्ट क्रमांक : १२