पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण - Page 214

१७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आजच्या भांडणाचे रूपांतर करण्यास तें कारणीभूत होतील. अस्पृश्यांचा आजचा सत्याग्रह शस्त्र्सन्यासयुक्त आहे; परंतु त्यांचे विरोधी जर प्रतिकाराच्या धोरणाचा अवलंब करतील तर अस्पृश्य लोकहि आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठीं दगडांचा व विटांचा मार खात न बसतां माणुसकी विसरून नि:शस्त्र व निरुपद्रवी सज्जनांना मारहाण करणाऱ्या पाशवीं वृत्तीच्या लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी उलट तशाच प्रतिकाराचे धोरण स्वीकारण्याच्या तजविजीस लागतील, अप्रतीकाराच्या सत्याग्रहाचे तत्व महाराष्ट्रीय अस्पृश्यांच्या तरी अंगी बाणलेलें नाहीं. इतकेच नव्हे तर अप्रतींकारावर अवलंबून राहिल्यास आपल्या उदात्त वर्तनाला क्लेंब्य समजून आपले प्रति पक्षी आपला छळ करण्यास अधिकच प्रवृत्त होतील हेंही ते विसरलेले नाहीत. तथापि हा सर्व मुळस्वभाव बाजूस ठेऊन अप्रतीकाराचें सोंग घेऊन हा सत्याग्रहाचा क्रार्यक्रम तडीस नेण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु हैं सोंग कितपत टिकेल हें सर्वस्वी त्यांच्या प्रतिपक्षाच्या वागणुकीवर अवलंबून राहील. आपल्या हल्ल्यामुळे जर्जर होऊन बहिष्कृत वर्गांतलें लोक मंदिर प्रवेशाची मागणी सोडून देतील, अशी समजूत बऱ्याचशा धर्म भोळ्या लोकांत त्यांच्या सनातनी पुढाऱ्यांनी उत्पन्न केली आहे. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचा उपाय योजून अस्पृश्यांना बंदी करा अशा प्रकारची हस्तपत्रके पुण्यांत वाटण्यांत आली. परंतु वाटेल त्या प्रकारचें अतिक्रमण करून अस्पृश्यांचा सत्याग्रह चालूं देऊं नये अशी शिकवण देणाऱ्या लोकांना आम्हाला असे सुचवावयाचें आहे कीं, जे अस्पृश्य लोक आज भक्तिभावाने व हिंदुधर्माविषयींच्या आपुलीकीच्या भावनेनें देवदर्शनासाठी येत आहेत तें गझनीच्या महमुदाप्रमाणें मूर्ती फोडण्याची मोहीम सुरूं न करोत म्हणजे झालें. पाण्याचा ओघ वळवितां येईल पण तो आडवितां येणार नाहीं. जो बांध घालून आडविण्याचा प्रयत्न करील त्याचा बांध तर फुटून जाईलच पण अडविलेलें पाणी अनर्थ केल्याशिवाय राहणार नाहीं. अज्ञ समाजांतील गुंडांच्या शक्तिवर उड्या मारून अस्पृश्यांना हिणविणाऱ्या, त्यांचा तेजोभंग करणाऱ्या या महामुर्खानीं ध्यान्यांत ठेविलें पाहिजे कीं, कोणत्याहि शक्तिचा आसुरी RAM उपयोग करणें यांत इतरापेक्षां स्वतःचाच नाश अधिक असतो.

अस्पृश्यांचे ढोंगी केवारी.

जीर्ण मतवाद्यांनी घातलेला हा गोंधळ आणि हिंदुधर्माची केलेली विटंबना उमगण्यासारखी आहे. परंतु या सत्याग्रह प्रकरणांत न उमगण्यासारखी व