पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण १७५
कोणीतरी नीच वृत्तीच्या लोकांनी घडवून आणली असली पाहिजे. खरोखरीच
जर पुण्यांतील अस्पृश्य वर्ग सत्याग्रहाच्या विरूद्ध असता तर आपला विरोध त्यांनी केव्हांच जाहीर केला असता. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी मुग्धता स्वीकारली नसती. - शिवाय ज्या महार लोकांनी सत्याग्रहाच्या विरूद्ध आपलें मत प्रसिद्ध केलें त्यांनी आपण होऊनच कबुली दिली आहें कीं, आपल्या सह्या फसवून घेण्यांत आल्या ! त्यांना कोणी फसविलें ही गोष्ट जाहीर झाली असती तर फार बरें झालें असतें. तथापि ही कारवाई अस्पृश्याशीं सहानुभूती दाखविणाऱ्या कोणातरी बदमाषांची असली पाहिजे. आम्हांस आनंद वाटतो कीं ज्या महार लोकांनी सत्याग्रहाच्या विरूद्ध आपलें मत जाहीर केलें होतें त्यांनी सत्याग्रहाच्या दिवशीं प्रसंग ओळखून निःशंकपणें सत्याग्रहांत भाग घेतला. आमच्या अस्पृश्यबंधूस आमची अशी नम्र सूचना आहे की, स्वतःच्या उन्नतिच्या बाबतींत त्यांनी कोणत्याही स्पृश्य माणसाच्या सल्लामसलतीवर विश्वास ठेऊन चालूं नये. नाहींतर ज्याप्रमाणे पुण्यांत ऐन आणिबाणीच्या प्रसंगी एकीची बेकी झाली तशी बेकी सर्वत्र झाल्याशिवाय राहणार नाहीं. |
अस्पृश्यता निवारणाचा प्रसार करून देवळें उघडावी असें ज्यांनी प्रतिपादन केलें व तेणें करून अस्पृश्यांची मनोभूमीका सत्याग्रही बनविण्यास जे कारणीभूत झाले त्याच लोकांनी ऐन वेळीं सत्याग्रहाशी आमचा कांहीं संबंध नाहीं असें म्हणून अवसानघात केला, इतकेंच नव्हें तर त्यांनी अस्पृश्यांत फूट पाडून त्यांच्या कार्यातील अडचणी शतगुणित केल्या. अशा प्रकारचे नामधारी अस्पृश्यतानिवारक लोक आमच्या मतें उघडपणें दंडेली करणाऱ्या सनातन्यांपेक्षांहि हीन दर्जाचें ठरतात, आणि म्हणून पुण्याच्या सनातन्यांच्या सभेंत त्यांचा जो निशेध करण्यांत आला तो योग्यच होता असें आम्हांस वाटते.
विचित्र कोटीक्रम.
या लोकांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला नाहीं, याची अनेक कारणें देण्यांत आली आहेत. त्यांतील एक कारण म्हणजे हा सत्याग्रह केवळ नांवाचा बडेजाव करण्याकरितांच करण्यांत आला होता हें एक होय. रा. राजभोजादि सत्याग्रहांत भाग घेणाऱ्या मंडळीवर॑ अंसा ठपका ठेवण्यांत आला आहे कीं, राजभोज सांप्रदायाप्रमाणें देवालयें स्वेच्छेने उघडण्याची कांही. मातंबरी नाहीं. कारण त्या योगे या सांप्रदायाला हवें असणारे पराक्रमश्रेय व॑ स्वावलंबनश्रेय हारपेल | उलट स्वेच्छेने देवळें उघडणाऱ्या देऊळवाल्यांस यापुढें कदाचित असें सांगावे लागेल कीं “तुम्ही कांही अस्पृश्य मंडळींना, विषेशतः त्यांतील पराक्रमेच्छू राजभोज संप्रदायी पुढाऱ्यांना कांही तरी युक्तीनें सत्याग्रहच करावयास लावा कांहीं