पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण - Page 219

पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण १७७

ती फक्त बद्ध वर्गात येऊं शकतें. अशा बद्धवर्गाचें मतपरिवर्तन करण्यासाठी व्याख्यानांशिवाय दुसरा कांहीं मतपरिवर्तनाचा मार्ग असल्यास तो पडताळून पाहण्यास आमची हरकत नाही. परंतु, तसा एखादा मार्ग आहे, याची आम्हांस कल्पना नाही. उलट आमची अशी खात्री आहे की, सत्याग्रह व मतपरिवर्तन हे दोन भिन्न व परस्परविरोधीं असें मार्ग नसून मतपरिवर्तन साध्य होण्यास सत्याग्रह हैं एक मोठेच साधन आहे. बद्ध लोकांच्या कोणत्याहि प्रश्‍नाची ज्ञानयुक्त धारणा करावयास लावण्यास त्यांच्या आचारांत व विचारांत मोठी क्रांति घडवून आणली पाहिजे. त्या शिवाय ते आत्मनिरिक्षण करण्यास उद्युक्त होणार नाहींत व तसें जोपर्यंत नाहीं तोपर्यंत त्याच्यांत मतांतर होणार नाहीं.

हा युक्तीवाद जर ग्राह्य धरला, आणि डोळ्यांत झणझणींत अंजन पाडल्याशिवाय ज्ञान नाहीं हैं जर कबूल केलें तर हेंहि मान्य करावे लागेल कीं, सत्याग्रहासारखी समाजाच्या दुराग्रहावर लागूं पडणारी कोणतीच दुसरी मात्रा नाही. कारण तिचा आघात प्रत्यक्ष आचारावर होत असल्याकारणानें ती दरेक माणसास विचार करण्यास लावते. याचे प्रत्यंतर खुद्द पुण्यातच पाहावयास सापडतें. पुण्यांत हल्ली जी खळबळ उडाली आहे व जे लोक पूर्वी अस्पृश्यता निवारणाच्या बाबतींत मुग्ध होते तेहि उघड बहिष्कृतांची बाजू घेऊं लागले आहेत हा कशाचा परिणाम आहे ? या प्रश्‍नाला एकच उत्तर आहे असें आमचे मत आहे. आणि तें उत्तर म्हणजे हा परिणाम सत्याग्रहाचा आहे; दुसरा कशाचाहि नाहीं. सत्याग्रहाला नाके मुरडणाऱ्या केसरी कंपूनें सत्याग्रहामुळे तडजोड घडवून आणण्यास आपण कबूल झालों यांचा केसरीतून इन्‌कार केलेला आहे. परंतु या केसरी कंपूला आमचा असा प्रश्‍न आहे कीं, सत्याग्रहापूर्वीच आपलें मतपरिवर्तन झालें होतें ही गोष्ट खरी असेल. परंतु त्या मतपरिवर्तनाप्रमाणें काही तरी प्रत्यक्ष कृति घडवून आणावी या उद्देशानें देवालय प्रवेशाच्या बाबतींत पंचाशीं मध्यस्थी करण्यास कोणता प्रसंग कारणीभूत झाला हें सांगून द्याल काय ? आमच्या मतें केसरीं कंपूला आपल्या मताप्रमाणे कृति करण्यास जर SMA भाग पाडलें असेल तर तें सत्याग्रहानेंच होय. सत्याग्रह जर झाला नसता तर केसरीचे मत वांझेच्या पुत्रेच्छे प्रमाणे कल्पनेंतच राहिलें असतें. सत्याग्रहाने केसरी कंपूस क्रिया करावयास लावली ही सत्याग्रहाच्या सामर्थ्याची कांही लहानशी साक्ष नव्हे. जे लोक अशा परिणामकारी उपायाला बिचकतात आणि त्याचा अवलंब निषिद्ध ठरवितात त्या लोकांची ध्येयाच्या ठिकाणी निष्ठा नसून ध्येयाविषयीं नुसती वाचाळता आहे असेंच

म्हणणें प्राप्त होतें.

तडजोडीच्या निष्फळतेची कारणें.

आतां हीं तडजोड निष्फळ ठरली हें खरें. तथापि, त्याचा दोष सत्याग्रहावर नसून मध्यस्थांच्या कमकुवतपणावरच ठेवला पाहिजे. हें तडजोड़ीचें कार्य