पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण - Page 220

१७८ डॉ. बाबासाहेब आंवेडकंर लेखन आणि भाषणे

रा. केळकर. रा. भोपटकर व रा. माटे यांच्यावर सोंपविण्यांत आलें याचेंच आधीं आम्हांला आश्चर्य वाटतें. तडजोड करणाऱ्याच्या अंगी दोहोंपैकी एकतरी गुण असावा लागतो. एकतर त्यांच्या अंगी एवढें थोरपण असलें पाहिजे कीं, त्यांच्या शब्दाला जनता मान तुकविण्यास तयार होईल किंवा तडजोड करणारांत निकराचा करारीपणा तरी हवा. सामोपचाराचें बोलणे ऐकले नाहीं व तडजोड केली नाहीं तर मध्यस्थांची मर्ने दुखावली जाऊन ते उघडपणें सत्याचो पक्ष घेऊन सामना देण्यास तयार होतील अशी दुराग्रही पक्षाला भिती वाटली पाहिजे. या दोन्ही दृष्टीनीं पहातां सदरील मध्यस्थ अगदी कूचकामारचे होते असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण त्यांचा शब्द खाली न पडण्याइतकें बहुजन समाजावर त्यांचे वजन नाहीं. अस्थिरबुद्धि व अनिश्चित कृती यामुळें रा. केळकर ह्यांना महाराष्ट्रांत मान नाहीं असे म्हटल्यास त्यांत अतिशयोक्ति होणार नाही असे आम्हास वाटते. या मध्यस्थांच्या ऐवजी जर हें कार्य एखाद्या खऱ्या हिंदुधर्माची

ओळख असणाऱ्या शंकराचार्याने हातीं घेतलें असतें तर त्यांत त्याला कदाचित

अधिक यश येण्याचा संभव होता. करारीपणाच्या दृष्टीनें पहावयास गेलें तर अगदी शून्य | जो मनुष्य अन्यायाने निकाल झाला तरी आपण कांहींच करणार नाहीं असें अगोदरच जाहीर सांगतो त्यानें हक्क संरक्षणाच्या प्रित्यर्थ न्यायाचे व नितीर्चे कितीही रडगाणें गाईले तरी त्याचें कोणीहि ऐकणार नाहीं हा व्यवहारांतील अनुभव सर्वांना आहेच. माटे, केळकर व भोपटकर यांनीं आगोदरच जाहीर केलें होतें कीं, मध्यस्थीचा घाट फसला तरी आपण सत्याग्रह केव्हांच करणार नाहींत. इतकंच नव्हें तर आपण सत्याग्रह करूं असें ज्यांनी जाहीर केलें होते त्यांच्या वर्तनाला कैसरीनें निंद्य म्हटलें आहे. जणूं काय सत्याग्रह करणें म्हणजे मद्यपान वा वेश्यागमन अशा पातकापेक्षांहि मोठें पातक आहे ! इतकें ज्यांचें दौर्बल्य आहे. त्याच्या हातून .जर. इष्ट अशी तडजोड झाली नाहीं तर: तो मध्यस्थांच्या कमकुवतपणाचा परिणाम आहे, सत्याग्रहाचा नव्हें असेंच म्हटले पाहिजे.

मतपारेवतंनाचें तुणतुणे वाजविणारांना सवाल,

या मतपरिवतैनवादी लोकांना आम्ही असें विचारितो कीं तुम्ही अस्पृश्यांचा देवालय प्रवेश होण्यापूर्वी किली काळ पर्यंत व किती लोकांचे मतपरिवर्तन करणार ? सर्वच स्पृश्य हिंदु जनतेचे मतपरिवर्तन झाल्याशिवाय अस्पृश्यांना मंदीर प्रवेश नसावा असे जर यांचें मत असल तर अस्पृश्यांना अनंतकालपर्यंत थाबावें लागणार आहे व तेवढ्याच कारणावरून हैं मत अव्यवहार्य म्हणून सोडून दिलें पाहिजे. आता स्पृश्य ।हदु समाजातील 'बहुजन समाजाचें मतपारिवर्तन झाले, म्हणजे मग अस्पृश्यांनी मंदीर प्रवेशाचा प्रयत्न करावा असें जर मतपरिवर्तनवाद्यांचे ध्येय