पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण - Page 221

०७९ पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण

असेल तर त्यामुळें सत्याग्रहाची जरूरी कमी न होतां उलट अधिकच शाबीद होते. कारण ज्यांचे मतपरिवर्तन झालें नाहीं अशा स्पृश्य हिंदूंनी जर अस्पृश्यांस मंदीर

प्रवेशाच्या बाबतींत अडथळा करण्याचें मनांत आणिलें तर, त्यांच्याविरूद्ध तरी अस्पृश्यांना सत्याग्रह हा करावाच लागणार आहे. अशा दृष्टीने पहातां

अस्पृश्यता निवारणासाठी

सत्याग्रहाशिवाय दुसरा उपाय नाहीं

असें आमचें प्रामाणिक मत आहे. आणणि जे लोक आज सत्याग्रहाविरूद्ध मतपरिवर्तनाची तळी उचलून धरीत आहेत ते जर निर्विकार बुद्धीने व प्रामाणिकपणाने या प्रश्नाचा विचार करतील तर त्यांनाही दिसून येईल कीं, मतपारवर्तनासाठों तरा सत्याजह हा झालीच पाहिजे

स्वराज्य ।मळपयंत थांबण्याचा सल्ला |

आमचा हा कोटिक्रम मान्य असूनहि ज्यांना सत्याग्रह अमान्य आहे असे शेट जमनालाल बजाज यांच्यासारखे we अस्पृश्यता निवारक आहेत, हें आम्ही कबूल करतों. परंतु त्यांची विचारसरणी आम्हांस पटत नाहीं. अस्पृश्यांनी सत्याग्रह करणें रास्त असलें तरी हल्लींच्या परिस्थितींत तो करणें ईष्ट नाहीं असें त्यांचे मत आहे. देशाची परतंत्रता घालविण्यासाठी सर्व देशांतील लोकांनी एकवट होऊन आज इंग्रज सरकारकडून स्वराज्य मिळविण्याचा घाट घातला असताना अशा आणिबाणीच्या वेळीं अस्पृश्यांनी आपल्या हक्काचे भांडण पुढे करून देशात दुही माजवावी हैं बरे नाहीं, या युक्तिवादाला आमचें असें उत्तर आहे कीं अस्पृश्यांची गुलामगिरी कायम ठेवण्याकारेतांच जर स्वराज्य मिळविण्याची खटपट असेल तर अशा खटपटीला जितकी विघ्ने आणतां येतील तितकी विघ्ने आणणे हें अस्पृश्य वर्गातील दरेक व्यक्तीनें आपलें कर्तव्यकर्म म्हणून समजलें पाहिजे.

आज अस्पृश्याना हक्क देण्यास जर स्पृश्यलोक तयार झाले असते तर आमच्या

कल्याणाबद्दल त्याना आस्था आहे असा विशवास ठेऊन स्वराज्याच्या दोऱ्या त्यांच्या हातांत जाऊं देण्यास अडथळा करा असा उपदेश कोणो केला नसता; परतु ज लोक आज आम्हांला साधे माणुसकीचे हक्क देण्यास तयार नाहींत ते उद्या स्वराज्य मिळाल्यानंतर आमची माणुसकी ओळखतील व स्वतःच्या माणुसकीला जागतील असे मानणारा एकही अस्पृश्य नाहीं. म्हणूनच ज्या स्वराज्याला स्पृश्यलोक भाग्य असें म्हणतात त्यालाच अस्पृश्य लोक एक मोठी आपत्ती आहे असे समजतात. खरोखर शेट जमनालाल बजाज यांचा युक्तीवाद आम्हांस अगदीं पोचट असा

कार