१८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्यांच्यावरील अन्याय दूर करून परस्परांत विश्वासाचा ऋणानुबंध उत्पन्न करणें हाच राजकारणांत एकी उत्पन्न करण्याचा राजमान्य मार्ग आहे असें आम्हांस वाटतें. अन्याय पिडीत लोकांना तुम्ही आतां ओरड करू नका, स्वराज्य मिळाल्यानंतर तुमची दाद घेऊं, असें सांगणें हा एकी उत्पन्न करण्याचा खुळा प्रकार आहे असेंच म्हटलें पाहिजे. कोणी कांहींही म्हणों, अस्पृश्य लोकांनी मात्र एवढें ध्यानांत ठेवलें पाहिजे की, कोणत्याही सबबीवर त्यांच्या स्वातंत्र्याचा काळ त्यांनी लांबणीवर टाकण्याच्या भरीस पडू नये, शत्रूंच्या अडचणी पाहून त्यांच्यावर मार करणें हा युद्धांतील एक सर्वसामान्य असा नियम आहे. त्याचा अवलंब सर्वत्र जेत्या विरूद्ध जित लोकांनीं केलेला आहे. आयरिश लोकांनीं इंग्लिश लोकांपासून आपलें हक्क प्राप्त करून घेण्यासाठीं ह्या मार्गाचा पदोपदी उपयोग केला होता. खुद्द कै. टिळकांनीं 'साम्राज्याच्या गरजा, येति आमच्या काजा' या आयरिश लोकांच्या वागणुकीचा अनुवाद करून हिंदुस्थानांतील लोकांनी तोच अडवणुकीचा मार्ग पत्करून जेव्हां जेव्हां इंग्लिश साम्राज्यावर आणिबाणीचे प्रसंग येतील तेव्हां आमचे हक्क द्या तरच आम्ही तुम्हाला सहाय्य करूं अशी निकराची वृत्ति राजकारणांत सदोदित ठेवण्याविषयीं शिकवण दिलेली आहे. स्वराज्यासाठी उतावीळ झालेल्या हिंदु पुढाऱ्यापासून आपले हक्क मिळवून घेण्याची हीच संधी आहे, असें पाहून आमचे हक्क द्या मग आम्ही तुमच्या स्वराज्याच्या मागणीला दुजोरा देतो, अशा हटीतटीनें मुसलमान लोक Rest वागत आहेत. मग बिचाऱ्या अस्पृश्यांनीच हें धोरण ठेवूं नयें असें म्हणण्यांत काय हाशील आहे. आमच्या मतें स्वराज्य मिळेपर्यंत थांबा म्हणून सांगणारा एक तर भोळा किंवा कार्यसाधु असला पाहिजे व ते ऐकणारा तर शुद्ध मूर्ख असला पाहिजे. आमच्या अस्पृश्य बंधूस आमचें असें सांगणे आहे, कीं, त्यांनी याउपर वेळ न दवडितां आपलें हक्क संपादण्याच्या कार्यास लागावे; त्यासाठी भरपूर व जोरानें तयारी करावी आणि विरूद्ध पक्षाच्या लोकांशीं त्यांच्याच साधनांनी सामना देण्यास सिद्ध व्हावें
कक
i
ै्ैी ||“
* अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.