(90
क्रांति कशाला म्हणतात ?
गेल्या खेपेस आम्हीं कम्युनिस्टांच्या चळवळीवर लिहिलेल्या अग्रलेखांत विषयानुरोधानें, सध्यांच्या परिस्थितींत झटपट क्रांति शक्य नाहीं व इष्ठहि नाहीं, असें म्हटलें होतें. त्यावर आमच्या एका व्यवसायबंधूनें भाष्य रचून, आमचे मत तत्त्वतः बहिष्कृत वर्गातफे चाललेल्या जोरदार चळवळीला विरुद्ध आहे आणि बहिष्कृत वर्गाच्या तशा चळवळीमध्ये आम्ही पडतों ते आमच्या तत्त्वाला सोडून पडतों, असें भासविण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सदरील व्यवसायबंधु हे आमच्या चळवळीचे एक ठरीव हितशत्रु असून, समाजसमतेची चळवळ तर त्यांच्या डोळ्यांत सतत खुपत असते, समाजसमतेच्या चळवळीवर किंवा तिच्या पुरस्कर्त्यांवर दोनचार शिंतोडे उडविल्याखेरीज जर एकादा आठवडा सुना गेला तर आपल्या जीविताची इतिकर्तव्यता अपूर्ण राहील असें त्याला वाटत असतें. अर्थातच, आमच्या लेखांतलें एक मधलेंच वाक्य वरच्यावर उचलून, एकादें पोर ' कशी मात केली ' अशा आविर्भावानें क्षुल्लक कारणास्तव टाळ्या fred, त्याप्रमाणें या वृद्ध अर्भकानें, आम्ही कोटिक्रमांत सांपडलो अशी विजयभावना व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या समाधानाच्या आड येऊ इच्छीत नाहीं. परंतु असल्या शब्दच्छलानें बहिष्कृत वर्गाच्या जोरदार चळवळीचे पाय तुटतील असा जर त्याला भ्रम असेल तर तो भ्रम मात्र त्याने सोडून द्यावा, इतकेच त्याला आणि त्याच्यासारख्या उथळ टीकाकारांना आम्हांला सांगावयाचें आहे. आमचा लेख कम्युनिस्टांच्या क्रांतिकारक चळवळी संबंधानें होता. कम्युनिस्टांचें ध्येय आत्यंतिक असलें तरी तें अयोग्य आहे असें आम्ही म्हटलें नव्हतें. कम्युनिझमूचें ध्येय जसें राजकीय स्वरूपाचे आहे तसेंच तें आर्थिक व सामाजिक स्वरूपाचे आहे, आणि सामाजिक बाबतींत लोकमतामध्यें प्रथम, जी क्रांति व्हावयास पाहिजे ती झालेली नाहीं. त्याचप्रमाणें कम्युनिझम्चे आर्थिक व राजकीय ध्येय समजण्याची पात्रता बहुजनसमाजाच्या अंगीं अद्यापि आलेली नाहीं. सोशियालिझूम व कम्युनिझम यांच्या ध्येयांमध्यें म्हणण्यासारखा कांहींच फरक नाहीं. कम्युनिझम (रशियांतील बोलशेव्हिक चळवळ) याला सध्या विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे आणि सोशियालिझम्चे अंतिम साध्य ज्यांना मान्य