क्रांति कशाला म्हणतात ? - Page 224

१८२ डॉ. वाबासाइव आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहे असे लोकहि कम्युनिस्टांच्या चळवळीविरुद्ध आहेत याचे कारण रशियन कम्युनिस्टांचे मार्ग व धोरण हीं झटपट क्रांतीच्या उद्देशानें योजिलेलीं असून उत्क्रांतीच्या मार्गाच्या आड येणारीं आहेत, हें होय. क्रांति घडवून आणण्याचा प्रयत्न करतांना सत्यासत्य, न्यायान्याय कांही पहावयाचा-नाहीं, अत्याचार निषिद्ध समजावयाचे नाहींत आणि वेळ पडल्यास रक्तपात करून सोव्हिएट पद्धतीवर नवीन राज्य स्थापावयाचें हा जो क्रांतिवादी कम्युनिस्टांचा मार्ग तो आम्हांला पसंत नाहीं, तो देशाच्या प्रगतीच्या आड येणारा आहे, इतकेंच नव्हे तर त्यामुळे पिच्छेहाट होण्याचाहि दृढ संभव आहे. असें आम्हीं आमच्या त्या लेखांत दर्शविले होतें. त्या आमच्या कसोटीस लावून पाहिल्यास आमंच्या चळवळीवर आक्षेप घेण्यास जागा आहे असें आम्हांस मुळींच वाटत नाहीं. हिंदुनहासभेंचें अध्यक्षस्थान डॉ. आंबेडकर यांना दिलें म्हणजे ते आपलीं सध्यांची मतें बदलतील अशी जी आमच्या सदरील व्यवसायबंधूंची समजूत आहे ती साफ चुकीची आहे. आमचे मार्ग झटपट क्रांतीचे व अत्याचारप्रवर्तक नाहींत. अः"च्या चळवळीवरच काय, परंतु एकंदर अस्पृश्यवर्गाच्या चळवंळीवरहि. ५ आक्षेप घेतां यणार नाहीं. समाज समता संघाची चळवळसुद्धां अत्याचाराच्या दोषापासून आलेप्त आहे. हिंदूंच्या देवळांत जाऊन देवदर्शन घेण्यास हिंदुसमाजांतल्याच एका वर्गाला मोकळीक असावीं असें म्हणणें हा काय क्रांतिवाद ? जातिभेदाचें निर्मूलन करावें असें म्हणून सहभोजनाचें समारंभ घडवून आणणें हा काय अत्याचार ? आतां एवढे खरें कीं, आजच्या हिंदुसमाजाची घटना आम्हांला बदलून घ्यावयाची आहे, विषमतेच्या जागीं समता स्थापन करावेयाची आहे, अन्याय नाहींसा करून न्याय नांदवावयाचा आहे, सर्वत्र बंधुभावाची वृद्धि करावयाची आहे. फुसक्या तडजोडीवर भरवंसा ठेऊन तत्त्वाचा भंग होऊं देणें आम्हांला पसंत नाहीं. आमच्या आक्षेपकांना मुळीं प्रगतिच नको आहे. त्यांभा धर्माच्या नांवाखाली अन्याय, जुलूम, विषमता व फाटाफूट हीं समाजांत कायम ठेवावयाची आहेत. अर्थातच, प्रगतीची थोड़ी जरी चळवळ झालीं तरी ते ' क्रांति ', ' क्रांति ' असा कोलाहल करतात. खरें म्हटलें असतां सोवळ्या हिंदु लोकांनींच बहिष्कृत बर्गावर राजरोस अत्याचार चालविले आहेत. बहिष्कृतांनीं आपले माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठीं किचित्‌ जरी हालचाल केली तरी त्यांचा अमानुष छळ करण्यास हे सोवळे धर्माभिमानी म्हणविणारे लोक कमी करीत नाहींत. अशा छळाचीं उदाहरणें आतांपर्यंत किती तरी प्रसिद्ध झालेलीं आहेत वं सर्व देशभर बहिष्कृत वर्गाचा छळ वर्षांतून तीनेशें साठं दिवस चालूच