पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण १८३
असतो. बहिष्कृतानीं आपल्या हक्कांकरिता गेल्या दोन चार वर्षात जी चळवळ केली तींत त्यांनी बाकीच्या हिंदूंवर अत्याचार केला कीं, बाकीच्या हिंदूंनीं त्यांच्यावर अत्याचार केला ? महाडच्या व पुण्याच्या सत्याग्रहामध्यै अत्याचार करणारे लोक बहिष्कृत वर्गातले होते कीं इतर हिंदु होते? परंतु, ' इकडून तिकडून मिळविलेल्या ' बुद्धीवर वर्तमानपत्र चालविणाऱ्या इसमाला ' क्रांति ' शब्दाची व्याख्या नीट कंळावी अशी कोणी अपेक्षा तरी कां करावी ?
Se gy heer a el
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.