भाकरी मागितली-दगड दिला ! - Page 232

(9६

“ भाकरी मागितली-दगड दिला / *

नाशिकला रामनवमीच्या दिवशी घडलेल्या प्रकाराची बातमीं मला येथें लागलीच तारेनें समजली. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या हातून घडलेल्या अन्यार्यी व पक्षपातीपणाच्या वर्तनाबद्दलचीहि सविस्तर माहिती मागाहून वाचण्यांत आली. अस्पृश्य प्रजेच्या दृष्टीनें विचार करता इंग्रज सरकारचें स्वामित्व हें मळमळीत सौभाग्याप्रमाणे आहे. ज्यांचा अस्पृश्य जनतेशीं संबंध येतो ते सारे सरकारी अधिकारी स्पृश्य वगपिर्कीच असतात ; आणि मराठेशाही अगर पेशवाई जाऊन आंग्लाई आल्यामुळें जरी या लोकांचे पोशाख बदललेले दिसले तरी यांचे अंत:करण कांही बदललें नाहीं. जिल्ह्याचा मुख्य अधिकारी जरी युरोपियन अगर इंग्रज असला तरी तो बहुधा या बाबतीत अजाण, तटस्थ व बेदरद असतो. त्याच्या हाताखालचे अधिकारी सांगतील तेवढेच त्याला ऐकूं येतें व दाखवितील तेवढेंच त्याला दिसतें. असे नसतें तर नाशिकाला परवा घडला तसला प्रकार इंग्रजांच्या राज्यातही कसा व कां घडला असतां ?

भाऊराव गायकवाड, रणखांबे, दाणी वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी तुरुंगवास निष्कारण पत्करावा लागला. त्यांतल्या त्यांत श्री. तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री, त्याच प्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदिवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यताही वाटली. नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षांत घेता, त्यांनी गेल्या तीन चार वर्षात जें स्वावलंबन व जें संघटन प्रत्यक्ष व्यवहारांत प्रगट करून दाखविलें व ज्या सोशिक व धेर्यवृत्तीचा माझ्या या बंधुभगिनींनी परिचय करून दिला ती ही सारीं घटना खरोखरच अपूर्व अशी आहे. दुसऱ्या कोणाचें सहाय्य नाहीं; कोणाची सहानुभूति नाही ; उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानें सर्वजण नाखूष व विरोधी बनलेले ; अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी, अस्पृश्यांकरतां व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहासारखी चळवळ सतत तीन चार वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणांत, एवढ्या उत्साहानें व इतक्या संघटीतपणानें चालवावी ही एकट्या हिदुस्थानांतीलच नव्हे तर जगातील सर्व पददलीत जनतेनें अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे असें म्हटल्यास त्यांत अतिशयोक्ती मुळींच नाहीं.