भाकरी मागितली-दगड दिला / * १९१
पण ब्राह्मणी धर्माने मूढ, अनुदार व असहिष्णु बनविलेल्या हिंदु समाजाला या सर्व गोष्टींचे काय होय ? या सत्याग्रहाच्या रुपानें अस्पृश्य बांधवांनी स्पृश्य हिंदूंजवळ समतेची कर्मीत कमी मागणी केली. आपल्या हिंदु बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली पण भाकरी ऐवजीं त्यांच्या पदरात ब्राह्मणादि स्पृश्य हिंदूंनी दगड धोंडे टाकले |
सिमला : — भीमराव आंबेडकर " -
SO On SON.
या वक्तव्याबाबत खालील घटना कारणीभूत होत्या :
१९३२ च्या रामनवमीला काळराम मंदिर, रामकुंड व सीताकुंड यांच्या क्षेत्रासभोवती पुन्हा सत्याग्रह करण्याचे जाहीर केल्यानंतर १५ एप्रिल या दिवशी सत्याग्रह झाला. सत्याग्रहाच्या वेळी १९ स्त्रिया, १३ पुरुष सत्याग्रही आणि सत्याग्रहींचे पुढारी सर्वश्री भा. कू. गायकवाड, सावळाराम दाणी, अमृतराव रणखांबे यांना अटक करण्यात आली. स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात सत्याग्रहासंबंधी तडजोड व्हावी, याबद्दल काही सवर्ण पुढाऱ्यांनी प्रयत्न केले. पण त्यात त्यांना जीर्णमताभिमानी सनातन्यांच्या दुराग्रहापुढे नांगी टाकावी लागली. अस्पृश्यांनी मात्र सनातनी व सुधारक हिंदुंच्यापुढे माना तुकविल्या नाहीत.
त्यांनी आपली सत्याग्रही चळवळ चालू ठेवली. ही चळवळ आपल्या माणुसकीच्या हवकासाठी आहे. तीत भक्तिभावना व आध्यात्मिक प्रगती वगैरे कल्पना यांना थारा नव्हता. या भावनांपासून अस्पृश्यांना मुक्त करावे, कारण या भावनाच अस्पृश्यांच्या मानसिक गुलामगिरीच्या शृंखलेतील दुवे होऊन गेली हजारो वर्षे बसलेल्या आहेत. त्या भावना नष्ट करणे, हेच ध्येय बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या पुढे ठेवले होते आणि या ध्येयाने प्रेरित होऊनच अस्पृश्य सत्याग्रही नांशिकात लढा लढत होते.
सवर्ण हिंदू व अस्पृश्य सत्याग्रही यांच्यात समेट होत नाही, हे पाहून कलेक्टरला शांतिरक्षणाची चिंता लागली. त्याने विचार करून दोन्ही पक्षांना कळविले की, रामकुंडाच्या बाबतीत आपापसात काही तडजोड झाली नाही, तर दोन्ही पक्षांनी आपली बाजू सरकारपुढे मांडण्याचा मी हुकूम HIG.
१ : जनता, दिनांक ३० एप्रिल १९३२.
* : खैरमोडे, खंड, ३ पृ. ३४९-३५०