भाकरी मागितली-दगड दिला ! - Page 234

१९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घटना क्रम खालील प्रमाणे :--

रणखांबे-गायकवाड-दाणी यांना अटक

सत्याग्रह संग्रामाला तोंड लागलें !

ता. १२-४-१९३२

नाशिक मंदिर प्रवेश सत्याग्रहासंबंधीची आमंत्रणें अचानकपणें खेडोपाडी पाठविण्यांत आली. यंदाहि सालाबादाप्रमाणें रामनवमीच्या उत्सवांत काळेराम मंदिरावर सत्याग्रह करावयाचा असा निर्धार नाशिक जिल्ह्यांतील अस्पृश्य बांधवांनी केला. यंदाचा सत्याग्रह फक्त काळेराम मंदिरापुरताच नव्हता. त्यांचे क्षेत्र रामकुंड-सीता कुंडापर्यंत वाढलें होतें. ही दोन्ही ठिकाणें एका ठिकाणीं नसल्यामुळे सनातनी लोकांना अस्पृश्यांना वेळ प्रसंगी मज्जाव करण्यासाठीं दोन्ही ठिकाणीं धरणें धरुन बसणें भागच होतें. तशांत नाशिकचे नवीन कलेक्टर मि.ब्राऊन यांनी 'आपापसांत कांहींतरी नक्की तडजोड करा नाहीं तर आम्हीं रामकुंडावरची सरकारी नियंत्रणाचा हुकूम अधिक aed शकत नाही अशा आशयाचा इशारा उभय पक्षास देतांच दोन्ही पक्षाला आपल्या पुढील धोरणाविषयीं ठराविक बेत करणें भागच होतें. सरकारी नियंत्रण काढून घेतल्यास उभयपक्षांत सत्याग्रहाच्या वेळी काय होईल-उभयपक्षाचा लढा कोणत्या थराला जाऊन कोणत्या विकोपास जाऊन पोचेल याचा नक्कीं ठोकताळा कोणालाच करतां येत नव्हतां. नाशिकचे वातावरण मात्र गंभीर स्वरुपाचे भासूं लागलें. एकदोन दिवसांत नाशिकमध्ये काय होणार (?) असा प्रश्‍न सर्वाच्या दृष्टीसमोर उभा असतांच मि. ब्राऊन, कलेक्टर साहेब यांनी रामकुंडाची मुदत आणखी एक महिनाभर वाढवून सरकारी नियंत्रणाचे छत्र ठेविले. सनातन्यांच्या जिवांत जीव आला. तरीपण रामनवमीला काळेराम मंदिरावर अस्पृश्य बांधव सत्याग्रह करण्यास कमी करणार नाहींत हीही गोष्ट तितकीच खरी असल्यामुळें या अरिष्टाला कसें तोंड द्यावें याबद्दलच्या सनातनी मंडळीच्या खाजगी बैठकी चालूं आहेत.

सत्याग्रहाचे निमंत्रण मिळतांच नाशिक जिल्ह्यांतील निरनिराळ्या गांवांहून सत्याग्रहाकरितां सत्याग्रही वीरांच्या तुकड्या बेसकर वाड्यांत जमूं लागल्या आहेत. सत्याग्रह कमिटी आपल्या स्वाभिमानाच्या लढ्यांविषयीं कोणतें धोरण ठेवावें याचा विचारविनिमय करीत आहे.

ता. १३-४-१९३२.

मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा लढा कशा रीतीनें मिटवावा अशा बाबत सनातनी व अस्पृश्य लोक विचारविनिमय करीत असतानांच डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटनें पुढील