* भाकरी मागितली-दगड दिला! ' १९५
कौतुकास्पद होती. सकाळीं मंदिरासभोवतालचें वातावरण बरेंच क्षुब्ध व गंभीर असें भासत होते. शांतता राखण्यासाठीं बंदोबस्त कडक रीतीनें ठेविण्यांत आला होता. मंदिर प्रवेशासाठीं जेव्हां लोक आंत जाऊं लागलें तेव्हां आगाऊ ठरल्याप्रमाणे सत्याग्रही वीरांनीं मंदिरांत जाण्याचा प्रयत्न करून सत्याग्रह करण्यास सुरवात झाली. एकामागून एक सत्याग्रही स्वयंसेवकांना अटक करण्यांत आली. जवळ जवळ वीस स्वयंसेवकांना अटक करतांच लगेच सत्याग्रह संग्रामाचे पुढारी मि. गायकवाड, दाणी व रणखांबे यांना अटक करण्यांत आली. यावेळीं अस्पृश्य जनसमुदायांत बरोच खळबळ उडाली. मंदिरांत स्पृश्य पुरुषांना पोलिसांनीं मज्जाव केला व फक्त स्त्रियांना आंत सोडण्यास सुरवात होतांच अस्पृश्य स्त्रियाहि त्यांच्याबरोबर मंदिरप्रवेश करीत असतां त्यांना अटक करण्यांत आलों.
बारा स्त्रियांना अटक
आमचेकडे बातमी येऊन पोंहोचेंपर्यंत एकंदर बारा स्त्रियांना अटक करण्यांत आली व मंदिराचे दरवाजे सर्वानाच बंद केले. पोलिस शिपायांची साखळी करून लोकांना मंदिराच्या दरवाज्यापर्यंत येण्याचा मज्जाव करण्यांत आला. एकंदर परिस्थिती चिंताजनक असून अस्पृश्य पुढाऱ्यांना पकडल्याची बातमी खेडोपाडी कळतांच अस्पृश्य लोक सत्याग्रह संग्रामासाठीं तातडींनें नाशिकला निघाल्याचे
कळतें.*
नाशकांत पेशवाईची चुणूक !
रामनवमीच्या दिवशीं पुढाऱ्यांना व इतर स्त्रीपुरुष सत्याग्रहींना पकडल्यावर त्या दिवशीं एकंदर जो प्रकार घडला तो उद्वेगजनक असल्यामुळें व अस्पृश्यांच्या छावणींतील सर्व लोक त्यामुळें अत्यंत हवालदिल झाल्यामुळें खरा प्रकार सर्वांस समजावा म्हणून मंदिर प्रवेश सत्याग्रह मंडळाचे अध्यक्ष श्री पतितपावनदास यांनीं खालील जाहीर पत्रक लागलीच त्या दिवशीं वर्तमान पत्राकडे प्रसिद्धी करतां पाठविले आहे :--
A statement.
As already announced, the untouchable satyagrahis went to the Kala Ram Temple at 8 A, M. to day * to offer satyagraha at the doors of the same which were open. By the orders issued under 144 Cri. P. C..not more than three persons were to go there in a batch. But when the untouchable satyagrahis went there they found that the toucnables were entering the tempie in large crowds and the Police were complacently
१ : जनता : १६ एप्रिल १९३२.
*The 15th April 1932.