* भाकरी मागितली-दगड fear! * १९७
कळेना. ब्रिटीश सरकारचे हुकुम धाब्यावर बसवून सनातनीं सरकारचे राज्य चाललेलें दृष्टोत्पत्तीस येत होते. हुकूमाच्या भाषेनुसार अस्पृश्य सत्याग्रही अगदीं तीन तीनच्या तुकडीनें मंदीर प्रवेशासाठीं जात असतानांच त्यांना अडवून त्यांची फळी फोडून सरकारी शिपाई व सनातनीं मंडळीं त्यांना मारहाण करीत होती व पकडून नेत होती. हा अत्याचार असह्य झाल्यामुळें अस्पृश्यांचे पुढारी श्री. भाऊराव गायकवाड, रणखांबे व दाणी स्वतः सत्याग्रह करण्यांस पुढें गेले. त्यावेळीं सरकारी अंमलदाराचें डोळे एकदम उघडले. सनातनी आश्चर्यचकित झाले. मि. ब्राऊन कलेक्टर साहेब इतक्यांतच तेथें आल्यामुळे मंदिराचे दरवाजे एकदम बंद करून प्रत्यक्ष पेशवाईच्या राज्यकारभाराचा लोप करण्यांत आला. मि. ब्राऊन हे नाशिकला नवीनच आल्यामुळें खऱ्या परिस्थितीची त्यांना तरी कोण जाणीव करून देणार ?१
nn पालन
१ . जनता : २३ एप्रिल 9932.