(919
४ धर्वाना z » ९
अस्पुर्यबा स्युश्यबा धवाना सदश
स्वाभिमान व समतेचा नाश करणारी व समाजाला काळिमा लागणारी
कृत्यें करूं नयेत.
माघ व फाल्गुन महिन्यात काहीं गावच्या देवांच्या काठ्या तालुक्याचे अगर जिल्ह्याचे ठिकाणचे मुख्य देवस्थानात जातात. या देवांच्या काठ्या घेऊन जाणाऱ्या स्पृश्य लोकांबरोबर अस्पृश्य समाजातील बरेच लोक दरसाल जात असतात. या काठ्या घेऊन जाणाऱ्या स्पृश्य लोकांची बडदास्त बऱ्या प्रकारची ठेवली जाते व त्यांना जाता येता देवाचा प्रसाद म्हणून जेवणें देण्यात येतात. काठी बरोबर आलेले म्हणून अस्पृश्य यात्रेकरूनांही प्रसाद म्हणून जी जेवणे वाढण्यात येतात ती गलीच्छ व उकीरडावजा किंबहुना उकरिञ्यावर वाढण्यात येतात अगर अस्पृश्य यात्रेकरूंच्या पदरात दुरूनच अन्न फंकण्यात येते. आपले अस्पृश्य बांधव तो देवाचा केवळ प्रसाद म्हणून तसल्या घाणेरड्या जागेवर बसून खातात. दुरून फेकलेले अन्न घेणे अगर घाणेरड्या जागेवरून बसून खाणे ही गोष्ट स्वाभिमानाला धवका लावणारी, विषमता दर्शवणारी अशी आहे.
स्वाभिमान व समतेचा ज्यावेळी नाश होतो अशी व समाजाला ज्यामुळे
काळिमा लागतो अशी कोणतीही कृत्यें कोणीही करूं नयेत. देवाचा प्रसाद जरी असला व तो स्वाभिमानाच्या आड येत असला तरी त्याचा आपण त्याग केलाच पाहिजे. स्पृश्य समाजाच्या मांडीस मांडी लावून जेवण्यासाठी जर देवस्थानचे पंच सरमिसळ आपली पानें मांडीत असली तरच आपण या प्रसंगी जेवावे. अपमानास्पद अन्नाचा आपण त्याग करावा. ज्याप्रमाणें आपण अस्पृश्य बांधव रायगडावर समानतेने स्पृश्य बांधवांचे बरोबर जेवलों त्याप्रमाणें जर जेवावयास मिळालें तरच देवस्थानच्या जेवणावळींत भाग घ्यावा नाहींतर हे अत्र अजिबात ग्रहण करूं नये.
टप्याचे पंच पुढारी व गांवकीतील पंच यांनी ह्या विषमताजनक जेवणावळींत यात्रेकरूनी भाग घेऊं नये म्हणून सर्वांना सांगावें व ही समाजहितघातक व लांछन लागणारी दुष्ट रूढी बंद करावी. जर आपणास जत्रेत अगर जेवणांत अगर