अस्पृश्यबांधवांना संदेश १९९
कोणतेही कामांत स्पृश्य हिंदू समानतेनें वागू देत नाहीत-अगर वागवीत नाहींत तर मग आपण त्यांच्या कोणत्याही कार्यात कां भाग घ्यावा ? आपण सर्वजण लवकरच धर्मांतर करणार असल्यामुळें, आपल्याला हिंदू देवांच्या कोणत्याही जत्रे-यात्रेंत अगर सणांत यापुढें भाग घ्यावयाचा नाहींच तरीपण धर्मांतराचे पूर्वीही आपण आपला समानतेचा बाणा सोडूं नये.
आपले पुढारी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची वरीलप्रमाणे आज्ञा लक्षांत घेऊन सर्वानी त्याप्रमाणें वागावें.
डॉ, बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या खास आज्ञेवरून,
सुभेदार-विश्राम गं. सवादकर.
छ छ छ
त त त त त सत त
जनता, दिनांक १५ फेब्रुवारी १९३६.