अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क २०१
आहे. अस्पृश्यांना जेरीस आणण्याचे जुने उपाय अपुरे पडू लागले आहेत, असा अनुभव येताच हिंदू लोकांनी अस्पृश्यांना भेडसावून व गांगरून टाकण्याचा एक नवीनच मार्ग शोधून काढला आहे. अस्पृश्यांनी धर्मातर केल्यास त्यांना नवीन राज्यघटनेत प्राप्त झालेल्या राजकीय हक्कांना मुकावे लागेल, असा गिल्ला हिंदू लोकांनी चालविलेला आहे. आतापर्यंत अस्पृश्य वर्गाने धर्मांतर केल्यास त्यांचे राजकीय हक्क नष्ट होतील असा इशारा अस्पृश्य वर्गाबद्दल सहानुभूती बाळगणारे काही स्पृश्य हिंदू मधून मधून देत असत. हे लोक अस्पृश्य वर्गाचे विरोधक नसून हितचिंतक होते. परंतु या हिंदू हितचिंतकांनी जे इशारे म्हणून म्हटले होते, त्याचा विरोधी लोक धमकी म्हणून उपयोग करीत आहेत. ता. २१ च्या ' जन्मभूमि ' नावाच्या गुजराथी दैनिक पत्रात अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती की, हिंदूधर्माचा त्याग करण्याच्या ठरावामुळे अस्पृश्य वर्ग कोंडीत सापडला आहे व हिंदूधर्माचा त्याग केल्यास जे राजकीय हक्क मिळाले आहेत ते नष्ट होतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे. या पत्राने अशी थाप उठवून दिली होती की, डॉ. आंबेडकरांना ही चूक कळून आल्यामुळे ते गांगरून गेले आहेत ; आणि म्हणूनच ते येत्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे रहाणार नसून आपल्या अनुयायांनाही तशा प्रकारचा सल्ला देत आहेत. ' बॉम्बे क्रॉनिकल ' च्या ता. २२ च्या अंकात तर या पत्राच्या प्रतिनिधीने फारच मोठी कंडी पिकवून विकली आहे. या पत्राच्या प्रतिनिधीने अशी बातमी प्रसिद्ध केली आहे की, डॉ. आंबेडकरांनी धर्मांतरामुळे राजकीय हक्क हिरावले जातील की काय या प्रश्नासंबंधी मुंबई सरकारबरोबर पत्रव्यवहार केला होता व मुंबई सरकारने त्यांना असे कळविले की, धर्मांतर केल्यास अस्पृश्यांकरिता कायदे कौन्सिलात राखून ठेवलेल्या जागेसाठी उमेदवार म्हणून उभे राहता येणार नाही. या बाबतीत डॉ. आंबेडकरांनी ' टाईम्स ऑफ इंडिया ' पत्राच्या प्रतिनिधीला दिलेली मुलाखत त्या पत्राच्या ता. २४ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाला मिळालेल्या राजकीय हक्कांवर धर्मातरामुळे कायद्याच्या दृष्टीने काय परिणाम घडतील या विषयी आपले मत सविस्तर रीतीने प्रदर्शित केले आहे. धर्मातराने अस्पृश्यांचे राजकीय हक्क नष्ट होतील अशी धमकी देणाऱ्या वृत्तपत्रांना आपली विचारसरणी बिनचूक आहे अशी खात्री वाटत होती. परंतु डॉ. आंबेडकरांनी आपली मुलाखत प्रसिद्ध केल्या नंतर ज्या ज्या लोकांनी एक आठवडाभर नंगानाच चालविला होता, त्या लोकांची दातखिळी बसून आता जिकडे तिकडे सामसूम झालेली दिसत आहे. डॉ. आंबेडकरांनी आपल्या तर्कशुद्ध विचारसरणीने या प्रश्नाची चर्चा इतक्या मुद्देसूदपणे केलेली आहे की, अस्पृश्य वर्गाच्या प्रतिस्पर्ध्यांना धर्मातरामुळे अस्पृश्यांचे राजकोय हक्क नष्ट