अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 245

अस्पृश्यांचे धर्मांतर आणि त्यांचे राजकीय हक्क २०३

वगैरे सर्वांचा समावेश होतो असे आपल्या उद्देश व नियम पत्रकात म्हटले आहे. जेथे हिंदू कोण आणि कोण नव्हे हेच अनिश्चित आहे तेथे अस्पृश्यांना हिंदू या कोंडीत कोंडून ठेवण्याचा प्रयत्न निष्फळ होणार आहे. हिंदुधर्म हे एक अशाप्रकारचे जाळे आहे की, ह्या जाळ्यातून कोणत्याही माणसास तो पुरेसा लवचिक जिभेचा व उलट्या काळजाचा असला तर त्याला निसटून जाता येईल, अशा स्थितीमध्ये हिंदू लोकांनी हा जो प्रश्‍न उपस्थित केला आहे त्याचा विचार करण्याची खरोखरी काही आवश्यकता नाही. परंतु प्रश्‍न महत्त्वाचा असल्यामुळे एवढ्या प्रास्ताविक मुद्दावरच निकाल करून सोडून देणे आम्हांस योग्य वाटत

नाही.

राजकीय हकक उपभोगण्यासाठी अस्पृश्यांनी हिंदू म्हणून घेतलेच पाहिजे काय या प्रश्‍नाचे खरोखरी दोन भाग पाडतात. एक नुसता हिंदू धर्माचा त्याग केला तर त्यांच्या राजकीय हक्कांवर काय परिणाम होईल व दुसरा हिंदू धर्माचां त्याग करून परधर्माचा स्वीकार केला तर त्यांच्या राजकीय हक्कांवर काय परिणाम होईल ? हिंदू लोकांनी उपस्थित केलेली बाब इतकी गुंतागुंतीची आहे की, वरीलप्रमाणे दोन भाग पाडूनच एक एका भागाचा निरनिराळा विचार करणे वाचकांच्या समजुतीच्या दृष्टीने इष्ट आहे. प्रथमतः नुसता हिंदू धर्माचा त्याग केला तर काय होईल ? त्यांना आपल्या राजकीय हक्कांना मुकावे लागेल काय ? या प्रश्‍नाचा विचार करू. या प्रश्‍नांचा विचार करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँक्टात निरनिराळ्या जातींना जे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे त्याला लागू असणाऱ्या कलमाचा परिचय करून घेणे अत्यंत जरूरीचे आहे. ज्या लोकांनी हे बुजगावणे पुढे केले आहे त्या लोकांना आमची अशी सूचना आहे की, त्यांनी अस्पृश्य वर्गाची जी व्याख्या कायद्यामध्ये केली आहे या व्याख्येकडे लक्ष पुरवावे. ही व्याख्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्टाच्या पहिल्या परिशिष्टाच्या २६ व्या कलमामध्ये दिलेली आहे. या कलमामध्ये अस्पृश्यवर्ग असा शब्दप्रयोग मुळीच केलेला नाही. ही गोष्ट प्रथमतः सर्वानी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे ती ही की या कलमामध्ये-डिप्रेसूड क्लासेस-दलित वर्ग असा देखील शब्द प्रयोग केलेला नाही. या कलमात जो शब्दप्रयोग केलेला आहे तो ' शेड्युल्ड कास्ट ' असा शब्दप्रयोग केलेला आहे. या शब्दप्रयोगावरून उघड आहे की, कलम २६ यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या धर्मावर अवलंबून ठेवलेली नाही. सम्राट बादशहा व त्यांचे कौन्सिल यांनी ज्या जातींना या लिस्टात घातले असेल त्यांना शेड्यूल्ड कास्ट म्हणण्यात यावे. अशी शेड्यूल्ड कास्ट याची व्याख्या करण्यात आलेली आहे. शेड्यूल्ड कास्ट म्हणजे फक्त पूर्वीचे अस्पृश्य किंवा डिप्रेस्ड