अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 247

अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क २०५

त्यांचे स्वतंत्र गट बनविले ते म्हणजे खिस्तीधर्म, इस्लामधर्म व पंजाबांतील शीख धर्म हे होत. अशा रीतीने जातीय निवाड्याने हिंदुस्थानामध्ये मतदारांचे दोन प्रकारचे संघ निर्माण केले आहेत. एक सामान्य मतदार संघ आणि दुसरा स्वतंत्र मतदार संघ. या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ती ही की, धर्मावलंबी स्वतंत्र मतदार संघात ठेवलेल्या राजकीय हक्कांचा उपभोग घेण्यासाठी ख्रिस्ती, इस्लाम व शीख या तीन धर्मापैकी ज्या धर्मांनुयायांचा तो संघ असेल त्या धर्माचे अनुयायित्व मान्य करणे ही एक आवश्यक अट आहे. परंतु सामान्य मतदार संघामध्ये दाखल होण्याकरिता आणि या मतदार संघाकरिता दिलेल्या हक्कांचा उपभोग घेण्यासाठी त्यांत समाविष्ट झालेल्या कोणत्या तरी धर्माचे अनुयायित्व मान्य करण्याची अट कायद्याने घातलेली नाही. ही गोष्ट मुसलमान व ख्रिस्ती मतदार संघांतील आणि सामान्य मतदार संघांतील मतदारांसाठी कायद्याने ज्या अटी ठरविल्या आहेत त्या ताडून पाहिले असताना सहज कळून येण्यासारखी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँक्टच्या ६ व्या परिशिष्टात मतदार होण्याला अवश्य असलेली पात्रता अंगी येण्याकरिता ज्या अटी कायद्याने घातल्या आहेत त्या पाहिल्या तर असे आढळून येईल की, मतदार २१ वर्षांचा असला पाहिजे, विवक्षित ठिकाणी ठराविक मुदतीपर्यंत वस्ती करीत असला पाहिजे अगर त्याचे शिक्षण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत झाले असले पाहिजे. या अटी जशा सर्वसाधारण मतदार संघातील मतदाराला लागू आहेत त्याचप्रमाणे स्वतंत्र मतदार संघातील मतदाराला या सर्वसाधारण मतदाराच्या अटी लागू आहेतच. परंतु ६ व्या परिशिष्टाच्या कलम ५ व कलम ६ याकडे नजर फेकली असताना असे दिसून येईल को विवक्षित धर्माचे अनुयायित्व ही एक जादा अट घालण्यात आली आहे. म्हणजे मुसलमान मतदार संघात सामील असलेला मनुष्य धर्माने आपण मुसलमान आहोत असे मान्य करणारा असला पाहिजे. ख्रिस्ती मतदार संघात सामील असलेला मनुष्य ख्रिस्ती धर्माचा तो अनुयायी आहे असे मान्य करणारा असला पाहिजे. तसेच शीख स्वतंत्र संघात सामील असलेला मनुष्य आपण शीख धर्माचे आहोत असे मान्य करणारा असला पाहिजे. सामान्य मतदार संघात सामील असलेला मतदार हा त्या सामान्य मतदार संघात ज्या अनेक धर्मांचा समावेश झालेला आहे त्यांपैकी कोणत्या तरी एका धर्माचा अनुयायी आहे असे त्याने मान्य केले पाहिजे अशी अट कायद्यात कोठेच घातलेली नाही. यावरून असे दिसून येईल की, सामान्य मतदार संघात धर्माला कोणत्याही प्रकारचे राजकीय महत्त्व देण्यात आलेले नाही आणि ज्यांचा समावेश सामान्य मतदार संघात करण्यात आला आहे त्यांचे राजकीय हक्क अमूक धर्म असण्यावर अगर नसण्यावर कोणत्याही प्रकारे अवलंबून ठेवलेले नाहीत. अस्पृश्य वर्गाचा

बाय ६४१ - ८६ r