अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 252

२१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

(३) बंगाल प्रांतखेरीज करून इतर कोणत्याही प्रांतांतील अस्पृश्य लोकांनी

बौद्ध धर्माचा स्वीकार केला असताना त्यांचे राजकीय हक्क नष्ट होणार नाहीत.

(४) पंजाब प्रांतखेरीज करून बाकी सर्व प्रांतांतील लोकांनी शीख धर्माचा

स्वीकार केला असतांना त्यांचे राजकीय हक्क नष्ट होणार नाहीत.

(५) कोणत्याही प्रांतांतील अस्पृश्य लोकांनी जैन, यहुदी, इस्राईली अगर

झोरोस्ट्रियन पार्शी धर्म स्वीकारला तर त्यांचे राजकीय हकक नष्ट होणार

नाहीत. हा नियम सर्व प्रांतांना लागू पडतो.

वरती जेथे आम्ही असे म्हटले आहे की, सर्व प्रांतांतील अस्पृश्य लोक खिस्ती अथवा मुसलमान झाले अथवा पंजाबमधील अस्पृश्य लोक शीख झाले तर त्यांचे राजकीय हक्क बुडतील यावरून कोणाही धर्मातरवादी अस्पृश्य माणसाने दुःखित होऊ नये किंवा स्वार्थसाधू हिंदूने समाधान मानू नये. कारण त्यांचे हक्क नष्ट होतील याचा अर्थ त्यांना कोठेच राजकीय हक्क उपभोगावयास मिळणार नाहीत, असा समज कोणीही करून घेऊ नये. त्यांचे हक्क बुडतील याचा अर्थ इतकाच की, अस्पृश्य म्हणून जे हक्क दिले-गेले आहेत त्यांचा उपभोग त्यांना घेता येणार नाही. परंतु अस्पृश्य म्हणून दिलेल्या राजकीय हक्कांना ते जरी आचवले तरी हिंदुस्थानातील मुसलमानांना व खिस्ती लोकांना प्रांतोप्रांती जे राजकीय हक्क दिलेले आहेत किंवा पंजाबात शिखांना जे राजकीय हक्क दिलेले आहेत त्या हक्कांचे खिस्ती म्हणून, मुसलमान म्हणून वा शीख म्हणून ते भागीदार होऊ शकतील. तेथे कसलीही आडकाठी येऊ शकणार नाही.

अस्पृश्य वर्गाला होता होईल तोपर्यंत नामोहरम करण्याचा हिंदूंनी केलेला हा पहिलाच उपद्व्याप नव्हे. पुणे-करार झाल्यानंतर तो निष्फळ कसा करावा व त्यापासून अस्पृश्य लोकांना जास्तीत जास्त लाभ कसा न घेता येईल अशी व्यवस्था करण्याचा घाट sts कमिटोपुढे करण्याचा शक्य तो प्रयत्न हिंदूंनी केला. अस्पृश्यांच्या प्राथमिक निवडणुकीत कमीत कमी चार उमेदवार उभे राहिलेच पाहिजेत. चारांपेक्षा कमी राहिले तर पुणे करारास बाध येतो, असा लबाडोचा मुद्दा हिंदू लोकांनी ets कमिटीसमोर मोठ्या आग्रहाने मांडला होता. चार उमेदवार उभे राहिलेच पाहिजेत असे जर ठरले तर अस्पृश्यांच्या मतांची विभागणी होऊन हिंदूंनी आपल्यातीलच थोडकीच मते भरीस टाकली असताना त्यांना आवडता असेल असा अस्पृश्यांतील उमेदवार निवडून देता येईल म्हणून चारही संख्या कमीत कमी आहे असा आग्रह ते धरून बसले होते. परंतु त्यांच्या दुर्देवाने हॅमंड कमिटीतील सभासद इतके मूर्ख नव्हते. त्यांनी हिंदूंची